spot_img
महाराष्ट्रअँपल मोबाईलच्या बनावट ऍक्सेसरी विकणाऱ्या दुकानांवर छापे, सात आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

अँपल मोबाईलच्या बनावट ऍक्सेसरी विकणाऱ्या दुकानांवर छापे, सात आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर शहरातील वाडियापार्क येथे अँपल मोबाईलच्या बनावट ऍक्सेसरी विकणाऱ्या सहा दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 37 लाख 62 हजार 369 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

14 मार्च 2024 रोजी जीआयपीएस प्रा.लि. मुंबई या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे (रा.ज्ञानदेव म्हात्रे चाळ, पूर्व कल्याण) यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समक्ष भेट देऊन अहमदनगर शहरातील वाडीया पार्क कॉम्प्लेक्स अहमदनगर येथील मोबाईल दुकानांमध्ये ऍ़पल कंपनीच्या नावाचा वापर करुन ऍ़पल कंपनीचा लोगो असलेली बनावट ऍ़क्सेसरी विक्री होत असल्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना याबाबत कळवून खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

आहेर यांनी पोउपनि/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे आदींचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने वाडीया पार्क कॉम्प्लेक्समध्ये माँ चामुण्डा मोबाईल कवर, ग्लास होलसेल विक्रेता या दुकानामध्ये हिमताराम वालारामजी चौधरी यासह 13 लाख 50 हजार 967 रुपयांचा मुद्देमाल,

व्हाईस टेलिकॉम मोबाईल ऍ़क्सेसरीज या दुकानात धनराज चंद्रकांत डेंगळे, रुपेश सुराणा  (फरार) यासह 14 लाख 82 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. या दुकानासह सहा दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. यात 7 इसमांना ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...