spot_img
राजकारणMaharashtra Politics : भाजपने लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात टाकला मोठा 'डाव', पडळकरांवर मोठी...

Maharashtra Politics : भाजपने लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात टाकला मोठा ‘डाव’, पडळकरांवर मोठी जबाबदारी

spot_img

पुणे / नगरसह्याद्री : भाजपने बारामतीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना खाली खेचण्यासाठी भाजपने विविध डावपेच टाकण्यास सुरवात केली आहे. लोकसभेसाठी भाजपनं ओबीसी चेहरा प्रभारीपदी निवडला असून ही जबाबदारी नवनाथ पडळकर यांच्याकडे दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. या खेळीतून भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून सुप्रिया सुळे यांना घेरण्याची रणनीती आखली आहे.

कोण आहे नवनाथ पडळकर
बारामती लोकसभा मदारसंघ हा ओबीसीबहुल मानला जातो. धनगर समाजाचे मतदान बरेच आहे. जिनियर व उच्चविद्याविभूषित असणारे नवनाथ पडळकर हे २०१९ च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांच्या पाठीशी बारामती लोकसभेच्या अनुभवाची शिदोरी आहे. नुकताच त्यांनी ओबीसी, वंचित, भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये ताकदीने प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे...

रजनीकांत 24 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये धमाका करणार ! ‘या’ सिनेमात झळकणार

मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री जया प्रदा का आहे फरार? नेमक्या कोणत्या प्रकरणात अडकल्यात? पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी...

अहमदनगरमध्ये २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार, पालकमंत्री व‍िखे यांचे मोठे सूतोवाच

अहमदनगर / नगर सह्याद्री : औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड...