spot_img
राजकारणMaharashtra Politics : भाजपने लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात टाकला मोठा 'डाव', पडळकरांवर मोठी...

Maharashtra Politics : भाजपने लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात टाकला मोठा ‘डाव’, पडळकरांवर मोठी जबाबदारी

spot_img

पुणे / नगरसह्याद्री : भाजपने बारामतीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना खाली खेचण्यासाठी भाजपने विविध डावपेच टाकण्यास सुरवात केली आहे. लोकसभेसाठी भाजपनं ओबीसी चेहरा प्रभारीपदी निवडला असून ही जबाबदारी नवनाथ पडळकर यांच्याकडे दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. या खेळीतून भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून सुप्रिया सुळे यांना घेरण्याची रणनीती आखली आहे.

कोण आहे नवनाथ पडळकर
बारामती लोकसभा मदारसंघ हा ओबीसीबहुल मानला जातो. धनगर समाजाचे मतदान बरेच आहे. जिनियर व उच्चविद्याविभूषित असणारे नवनाथ पडळकर हे २०१९ च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांच्या पाठीशी बारामती लोकसभेच्या अनुभवाची शिदोरी आहे. नुकताच त्यांनी ओबीसी, वंचित, भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये ताकदीने प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात अवकाळीचे संकट, विजांच्या कडकडाटासह पाऊस; येलो अलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री : राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यावरील...

सलमान खानला पुन्हा धमकी; घरात घुसून मारणार, गाडी बॉम्बने उडवून देणार…

मुंबई / नगर सह्याद्री - अभिनेता सलमान खानला मागील काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या...

नेते बदलतात, पण जनता कधीच विसरत नाही; श्रीरामपूरसाठी डॉ. सुजय विखेंचा निर्धार..

  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दत्तनगर येथे १०१ घरकुलांचे भूमिपूजन श्रीरामपूर : नगर सह्याद्री श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण...

मळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीच्या काठीची सवाद्य मिरवणूक लक्षवेधी

  काठीच्या मिरवणुकीत हजारो भावीकांचा सहभाग / मळगंगा देवीच्या जयजयकाराने परिसर निनादून गेला निघोज / नगर...