spot_img
ब्रेकिंगड्रायव्हिंग लायसन्स हरवले? 'अशा' प्रकारे मिळवा परत

ड्रायव्हिंग लायसन्स हरवले? ‘अशा’ प्रकारे मिळवा परत

spot_img

नगर सहयाद्री टीम-
तुम्ही वाहन चालक असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स हे तुमच्यासाठी महत्वपूर्णे कागदपत्र आहे. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास, पकडल्यास ट्रॅफिक पोलिस तुम्हाला चालान देऊ शकतात. त्याचबरोबर पोलिसांना हवे असल्यास ते तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवल्याबद्दल तुरुंगातही पाठवू शकतात. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स जवळ आसने आवश्यक असते.परंतु अनेक वेळा लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवते.

तेव्हा अनेक जण काळजीत पडत असतात. जर तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर तुम्हाला कधीही घाबरण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आणि ड्रायव्हिंगसाठी चालान जारी न करण्याच्या टिप्स सांगणार आहोत.

  • डुप्लिकेट लायसन्ससाठी असा करा अर्ज
    सर्वप्रथम रस्ते वाहतुकीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
    वेबसाइटवर सर्व तपशील दिल्यानंतर, एलएलडी फॉर्म भरावा लागेल.
    फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
    आता आरटीओ कार्यालयात जाऊन हा फॉर्म सबमिट करा.
    प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट डीएल मिळेल.
    आरटीओ कार्यालयात जाऊनही तुम्ही फॉर्म भरू शकता.

घरपोह मिळेल डुप्लिकेट लायसन्स
तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज केल्यास, तुमचे डुप्लिकेट डीएल इंडिया पोस्टच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे घरी पाठवले जाईल. म्हणून, जेव्हा तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्म भरता, तेव्हा तुमचा पत्ता अचूक भरा.

डुप्लिकेट बनवण्यासाठी किती आहे शुल्क?
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स फी तुम्ही निवडलेल्या परवान्याच्या प्रकारावर अवलंबून असते. जर तुम्ही कागदाची डुप्लिकेट डीएल बनवले, तर तुम्हाला 200 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर स्मार्ट DL साठी तुम्हाला 400 रुपये शुल्क द्यावे लागतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....