spot_img
अहमदनगरब्रेकिंग: नगर-कल्याण महामार्गावर अपघात!! चिमुकलीचा मृत्यू तर तीन गंभीर

ब्रेकिंग: नगर-कल्याण महामार्गावर अपघात!! चिमुकलीचा मृत्यू तर तीन गंभीर

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
नगर कल्याण महामार्गावर कर्जुले हर्याच्या कोकाटे वस्ती जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोची झाडाला धडक बसल्याने ८ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहे. शनिवार दि १३ एप्रिल रोजी पहाटे‌ ५.३० ही घटना घडली असून या घटनेत देविका अनिल फुलमाळी ( वय ८ वर्षं, रा. निरगुडी ता. पाटोदा ) ही जागीच ठार झाली आहे. तर चालक अनिल रामा फुलमाळी अनिता रामा फुलमाळी व रुद्राक्ष अनिल फुलमाळी सर्व ( रा. निरगुडी ता. पाटोदा ) हे तिघेजण जखमी झाले असून त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे.

अधिक माहिती अशी: फुलमाळी कुटुंबीय आपल्या मालकीच्या चार चाकी वाहनाने ( क्रमांक एम. एच. १२ केपी ८२९४ ) ने खोपोली येथे दोन दिवसापूर्वी यात्रा उत्सवासाठी खेळणीसह इतर माल विक्रीसाठी गेले होते.

शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी आपल्या गावाकडे परतत असताना नगर कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या येथील कोकाटे वस्ती शिवारातील शनिवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान झोपेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचे वाहन झाडाला आदळले. अपघातामध्ये चिमुकली देविका जागीच ठार झाली असून तिघे जण जखमी झाले आहे.

गेल्या चार दिवसाच्या कालावधीत टाकळी ढोकेश्वर ते कर्जुले हर्या हद्दीपर्यंत दोन मोठे अपघात झाले असून या दोन्ही घटनेत दोन मयत तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रितम मोढवे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र खेमनर आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...