spot_img
महाराष्ट्रआता गर्दी काय असते ते पहाच! उपोषणाचा दुसरा दिवशी मनोज जरांगे पाटील...

आता गर्दी काय असते ते पहाच! उपोषणाचा दुसरा दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी दिला मोठा इशारा

spot_img

Manoj Jarange Patil प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरु आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. प्रवीण दरेकर यांनी काल मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका केली होती. तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे, मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर असे दरेकर म्हणाले होते. यावर मनोज जरांगे चांगलेच संतापले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दरेकर तुम्ही किती शातीर आहे, किती मारेकरी आहे, हे मला आंतरवालीत बसून माहिती आहे. माझ्या विरोधात अभियान सहा महिन्यापासून सुरू केलंय. मला निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर गुंतवणार आहेत. दरेकर मराठ्यांच्या लोकांना आमिष देवून फोडत आहे. एका आमदारकीचा माज दाखवू नका.असे म्हणत भाजपमधल्या ६५ ते ७९ लोकांना फटका बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

पुढे बोलतांना त्यांनी प्रवीण दरेकर यांनी समस्त महाराष्टातील मराठा समाजातील मुलांचा अपमान केला असल्याचं म्हटलंय. हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. छगन भुजबळ ज्या पक्षाचा प्रचार करणार, मराठा समाज त्याचा शंभर टक्के सुपडा साफ करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

भाजपामधल्या मराठ्यांना आता जागं होण्याची वेळ आहे. माझं खोटंनाट आणणार, मला बदनाम करणार, मला आणि समाजाला राजकारण करायचं नाही, आमचं ठरलेलं आरक्षण द्या, अशी मागणी करत आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...