अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य नाट्य संमेलन दि.11 व 12 सप्टेंबरला नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयात होत आहे, दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. गुरवार दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
तसेच दि.12 सप्टेंबर रोजी राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यातील नामवंत साहित्यिकांच्या मांदीयाळीने हा साहित्योत्सव रंगणार असून दोन दिवस ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, काव्यांजली, निमंत्रितांचे कवी संमेलन, परिसंवाद, मुलाखत, संगीत रजनी, एकांकिका नाटक, महाचर्चा, प्रकट मुलाखत व पुरस्कारांचे वितरण अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी महिती संमालेनाचे स्वागताध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉ.प्रशांत भालेराव यांनी दिली.
सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले, संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व समारोप सत्र होणार आहे. संमेलांची सुरवात ग्रंथ दिंडीने होणार असून संमालेनाचे स्वागताध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉ.प्रशांत भालेराव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडीस प्रारंभ होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
सकाळी 10 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते होणार आहे. न्यू आर्टस् महाविद्यालयातील परिसरात असलेल्या कविवर्य ग.ल. ठोकळ मंडपात कवी कट्टा रंगणार असून या कवी कट्ट्याचे उद्घाटन अभिनेत्री गौरी देशपांडे त्यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, इंदिरा संत, बा.भ.बोरकर आदी प्रख्यात कवींच्या कवितांचा काव्यनृत्य अविष्कार असलेला काव्यांजली हा कार्यक्रम श्रीमती सुरेखा डावरे व अंजली वृत्तालयाच्या विद्यार्थिनी सादर करणार आहेत.
सकाळी 11 वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष गौरी देशपांडे, स्वागताध्यक्ष प्रशांत भालेराव, आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त यशवंतराव गडाख, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे, साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष विवेक भापकर, सचिव ॲड.विश्वासराव आठरे, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ॲड.दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त नंदकुमार झावरे, डॉ सुधा कांकरिया, अविनाश घुले, अजित बोरा आदी उपस्थित राहणार आहे.
दुपारच्या सत्रात निमंत्रित कवींचे संमेलन रंगणार असून प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी नाशिकचे प्रकाश होळकर, पुण्याच्या अंजली कुलकण, श्रीरामपूरचे बाबासाहेब सौदागर, पुण्याचे देवा झिंजाड, नगरचे शशिकांत शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे गुंजन पाटील, चंद्रकांत पालवे, अविनाश काठवटे यांच्यसह संमेलनानिमित्त झालेल्या काव्य स्पर्धेतील विजेती कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
दुपारी 4 ते 5:30 वाजता समाज माध्यमे व नाट्य क्षेत्र या विषयावर डॉ बापू चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते मिलिंद शिंदे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते अभिजीत दळवी, लेखक सदानंद भणगे, संदीप दंडवते, रायबा गजमल व उमेश घेवरीकर आदींचा समावेश आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकेच्या खास प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सागडे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले व प्रा.प्रसाद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. बदलती शिक्षण व्यवस्था आणि मराठी साहित्य या विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, कार्याध्यक्ष भालचंद्र बालटे, उपाध्यक्ष सदानंद भणगे, प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर, कोषाध्यक्ष स्नेहल उपाध्ये यांच्या सर्व कार्यकारणी सदस्य तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाचे संचालक डॉ.भास्करराव झावरे, प्राचार्य बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ कल्पना दारकुंडे व डॉ. अनिल आठरे, प्रबंधक बबन साबळे, पर्यवेक्षक सुभाष गोरे, अधीक्षक जगन्नाथ साबळे व राजू पाटील प्रयत्नशील आहेत.