spot_img
तंत्रज्ञानLava Blaze 2 5G : अवघ्या 10 हजारांत लॉन्च झाला 5G स्मार्टफोन,...

Lava Blaze 2 5G : अवघ्या 10 हजारांत लॉन्च झाला 5G स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स

spot_img

Lava Blaze 2 5G launched : Lava ने आपला लेटेस्ट बजेट 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Lava Blaze 2 5G हे Blaze 5G चे अपग्रेड आहे. जे गेल्या वर्षी (2022) लाँच करण्यात आले होते. स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा डिस्प्ले, 6 जीबी व्हर्च्युअल रॅम, डायमेंशन 6020 प्रोसेसर सारखे फीचर्स आहेत. येथे आपण लेटेस्ट लावा स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्सबद्दल पाहणार आहोत…

Lava Blaze 2 5G स्पेसिफिकेशन्स
Lava Blaze 2 5G स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच (1600 × 720 पिक्सल) एचडी + एलसीडी कर्व्ह स्क्रीन आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. लावाच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 6020 7nm प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी माली-G57 MC2 GPU यात आहे. लावाच्या लेटेस्ट बजेट फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजव्यतिरिक्त 6 जीबी रॅम सह 128 जीबी

स्टोरेजचा पर्याय आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. Lava Blaze 2 5G स्मार्टफोन Android 13 वर चालतो. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये एपर्चर F/1.8 सह 50MP प्राथमिक मागील सेन्सर आहे. फोनमध्ये रिंग लाइट आणि मागील बाजूस दुय्यम AI कॅमेरा देखील आहे. लावाच्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि एफएम रेडिओ देखील या उपकरणात उपलब्ध आहेत. स्मार्टफोनची परिमाणे 164.2x76x8.45mm आणि वजन 203 ग्रॅम आहे.

Lava Blaze 2 5G किंमत
Lava Blaze 2 5जी स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा फोन ग्लास ब्लॅक, ग्लास ब्लू आणि ग्लास लॅव्हेंडर कलरमध्ये खरेदी करता येईल. हा फोन अॅमेझॉन इंडिया आणि लावा इंडियाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हा हँडसेट 9 नोव्हेंबरपासून ऑफलाइन स्टोअर्समधून उपलब्ध होणार आहे. हा लावा हँडसेट खरेदी करून ग्राहक ‘फ्री होम डिलिव्हरी सर्व्हिस’च्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन; १०० कलावंतांची ‘नांदी’, १०० कलावंतांचा ‘नृत्याविष्कार’

अहिल्यानगर। नगर सहयाद्री: - नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय...

गावात बेकायदेशीर अतिक्रमण, सरपंचाने घेतला आक्रमक पवित्रा; जिल्हा परिषदेसमोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा...

युवकावर कोयत्याने हल्ला; अहिल्यानगर मधील घटना

वाहनांची तोडफोड | आठ जणांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर । नगर सहयाद्री: शहरातील जुने कोर्ट जवळ एका...

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत...