spot_img
ब्रेकिंगBreaking News : ‘जाळपोळ करणारे मराठे नव्हते, उलट मला मराठा कार्यकर्त्यांनी वाचवलं’,...

Breaking News : ‘जाळपोळ करणारे मराठे नव्हते, उलट मला मराठा कार्यकर्त्यांनी वाचवलं’, आ.प्रकाश सोळंकेंनी केला ‘हा’ मोठा उलगडा

spot_img

बीड / नगर सह्याद्री : मराठा आंदोलनाची धग महाराष्ट्रभर जाणवत आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली होती.

पण आता आमदार प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भात सर्वात मोठा खुलासा केला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे कार्यकर्ते मराठा समाजातील नव्हते. ते बिगर मराठा होते. प्रकाश सोळंके यांनी ते आपल्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे मराठा कार्यकर्त्यांनीच आम्हाला या २५० ते ३०० समाजविघातक कार्यकर्त्यांपासून वाचवले, त्यांच्यामुळेच आपला जीव वाचला, असे प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

‘माझ्या बंगल्यासमोरील गर्दीत मराठा समाजाव्यतिरिक्त इतर लोक होते. त्याचबरोबर अवैध धंदे, वाळू, गुटखा, धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून माझे काही राजकीय विरोधक आहेत, त्यातील काही त्या जमावात दिसले. असं मोठं स्पष्टीकरण प्रकाश सोळंके यांनी केलं.

‘इतर आंदोलक दगडफेकीला विरोध करत होते’
“आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. त्या फुटेजमध्ये 200 ते 250 जणं दगडफेक करत होते. तर इतर आंदोलक या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. ज्यांनी मला संरक्षण दिलं ते मराठा समाजाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला सीसीटीव्हीचे फुटेज दिले आहेत. त्यामध्ये समाजकंटक, माझा राजकीय विरोध करणारे,

माझे राजकीय विरोधक स्पष्टपणे दिसत आहेत. मी पोलिसांकडे मागणी केलीय की, सरसकट सर्वांना अटक न करता तुम्हाला कॅमेऱ्यात दगडफेक करताना जे दिसत आहेत त्यांनाच अटक करण्याची विनंती केलीय”, असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं. “सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 21 आरोपी भेटले आहेत. त्यापैकी 8 आरोपी हे मराठा व्यतिरिक्त आहेत. ते कोणत्या जाती-धर्माचे आहेत ते मला माहिती आहे, पण मला बोलायचं नाही”, असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...