ऑटो संघटना फेडरेशनच्यावतीने आ.जगताप यांचा सत्कार
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
रिक्षा फिटनेस, पासिंगबाबींसाठी लेटफी ही दर दिवसाला ५० रुपये लावण्यात आली होती. या विरोधात नगरसह राज्यातील रिक्षा पंचायतीने आवाज उठविला. त्यासाठी निवेदने, विविध आंदोलन करावी लागली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनीही पुढाकार घेत याबाबत राज्याचे परिवहन मंत्री यांच्याशी मुंबई येथे बैठक घेऊन ही अन्यायकारक दंडाची रक्कम रद्द करण्याबाबत सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा दंड राज्यात तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी लवकरच चर्चा करुन हा दंड वसुली कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.संग्राम जगताप यांनी सांगितले.
जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्यावतीने रिक्षा चालक-मालकांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आ.जगताप बोलत होते. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश घुले, जिल्हा रिक्षा पंचायतचे अध्यक्ष वैभव जगताप, दत्ता वामन, अशोक औशिकर, विलास कराळे, समीर कुरेशी, विजय शेलार, गुलाब दस्तगीर, बबन बारस्कर, अल्लाउद्दीन पठाण, विष्णू आंबेकर, अभय पतंगे, सुनिल रासकर, गोरख खांडवे, सचिन तनपुरे, शाहिद, जुनेद शेख, रिजवान शेख, गोविंद पोकळे, सलिम मुलानी, राहुल शिरसाठ, अशोक चौबे, निजामभाई, बाळासाहेब उबाळे, संजय कदम, हनुमंत दारकुंडे, प्रमोद बेदमुथा आदी उपस्थित होते.
घुले म्हणाले, रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी आपला कायमच पुढाकार राहिला आहे. सध्या फिटनेस दंडाबाबतची अन्यायकारक आदेश रद्द व्हावा, यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली, पुणे येथील राज्याचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. आ.संग्राम जगताप यांनी याबाबत पुढाकार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन ही दंडाचा आदेश रद्द केला. हा फेडरेशनच्या एकत्रित प्रयत्नाचा विजय आहे. यात आ.संग्राम जगताप यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. नगरच नव्हे तर राज्याचा हा प्रश्न सध्यातरी मिटला आहे त्याबद्दल संघटना त्याच्याप्रती कायम कृतज्ञ राहील, असे सांगितले.
कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावणार
रिक्षा चालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्याचबरोबर नगरचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठीही राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला जाता आहे. त्या माध्यमातून नगरचे सर्वच रस्ते दर्जेदार व काँक्रीटी करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहन चालकांनाही चांगला फायदा होणार आहे. रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार
– आमदार संग्राम जगताप