spot_img
अहमदनगरएक फोन आला अन दोन लाख घेऊन गेला! महावितरणच्या अधिकाऱ्याचा सोबत नेमकं...

एक फोन आला अन दोन लाख घेऊन गेला! महावितरणच्या अधिकाऱ्याचा सोबत नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आयसीआयसी आय बँकेच्या नावे आलेल्या बनावट फोनला प्रतिसाद दिल्याने नोकरदार व्यक्तीच्या क्रेडीट कार्डवरून २ लाख तीन हजार ३०४ रूपये ऑनलाईन कट झाल्याची घटना घडली आहे. सुदीप याकोब साळवे (वय ४० रा. कायनेटीक चौक, नगर) असे फसवणूक झालेल्या नोकरदार व्यक्तीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात आलोक सिंगला (पूर्ण नाव, पत्ता नाही) नावाच्या व्यक्तीविरूध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे महावितरणमध्ये नाशिक येथे नोकरीला आहे. त्यांचे कुटुंब नगर शहरातील कायनेटीक चौक परिसरात राहाते. ते शनिवार व रविवारी नगरमध्ये येत असतात. गेल्या दुपारी ते नगरमधील घरी असताना त्यांच्या मोबाईल नंबरवर एक अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोन करणार्‍या व्यक्तीने फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकमधून आलोक सिंगला बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या के्रडीट कार्डचा सीपीपीफ काढून टाकायचा आहे.

त्यासाठी बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करा असे सांगितले. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आयसीआयसीआय बँकेचे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी अ‍ॅटोरीड झाला व काही वेळातच त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख एक हजार ६५२ रूपये कट झाल्याचा मेसेज आला.

काही वेळानंतर पुन्हा एक लाख एक हजार ६५२ रूपये कट झाल्याचा मेसेज आला. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीला के्रडीट कार्डवरून पैसे कट झाल्याचे सांगितले असता त्याने तुमचे पैसे २४ तासात तुमच्या क्रेडीट कार्डवर पुन्हा जमा होतील असे सांगितले. दरम्यान, फिर्यादी यांना पैसे न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी सुरूवातीला ऑनलॉईन तक्रार दाखल केली व नंतर मंगळवारी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...