spot_img
ब्रेकिंगलाडकी बहिणी योजना; 'या' जिल्ह्यातील एक लाख महिला अपात्र?, कारण..

लाडकी बहिणी योजना; ‘या’ जिल्ह्यातील एक लाख महिला अपात्र?, कारण..

spot_img

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचं टेन्शन वाढत आहे. लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर तपासणी केली जात असून सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्जांची निकषांनुसार पडताळणी केली जात आहे. त्यामुळे नियम बाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले. पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे.

वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत. तसेच जिल्ह्यात 15 हजार 566 महिलांकडे चारचाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झाली आहे. त्यांचाही अर्ज बाद झाला आहे. त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे.

या योजनेचा अकरावा हप्ता मेअखेर वितरित होणार आहे. आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही. त्यांना ऑनलाइन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहिती नाही. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही, याची माहितीच समजत नाही. सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...