spot_img
ब्रेकिंगAhmednagar Breaking: 'कोतवाली' ला 'लय भारी' चा मान! ७७ लाख ५४ हजारांचा...

Ahmednagar Breaking: ‘कोतवाली’ ला ‘लय भारी’ चा मान! ७७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन

spot_img

नगर। नगर सहयाद्री-

आपला काही वस्तु हरवला किंवा चोरीला गेला, की त्या परत मिळण्याची शक्यता अशी कमीच असते. मात्र कोतवाली पोलिसांच्या धडाकेबाज कामगीरीमुळे तब्बल पाऊण कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला असून कोतवाली पोलिसांनी नागरिकांकडून ‘लय भारी’चा मान मिळाला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल १२ लाख ३६ हजारांचे एकूण ७७ मोबाईल, गुन्ह्यातील जप्त ११ लाख किमतीच्या ४५ मोटरसायकल, बेवारसपणे मिळून आलेल्या वर्षानुवर्ष पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेली २७ लाख ७५ हजार किमतीची १११ दुचाकी आणि चारचाकी वाहने, गुन्ह्यात जप्त असलेले ९५ हजार किमतीचे १९ मोबाईल, सोन्या-चांदीचे ७ लाख ३५ हजार किमतीचे दागिने असा एकूण ७७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.

पुढील काही दिवसात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आणखी सोन्या चांदीचे दागिने मूळ मालकांना परत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी बोलताना दिली. संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून महागडे मोबाईल, दुचाकी चारचाकी वाहने, सोन्या चांदीचे दागिने आदींची चोरी केली जाते.त्यामुळे या चोरी मुद्देमालाचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान समोर उभा राहते. पोलीस निरीक्षक यादव यांनी या तपासासाठी सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.

संबंधित तपासातील अंमलदारांनी विशेष मोहीम हाती घेत तांत्रिक तपास करून मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत हा मुद्देमाल नागरिकांना परत मिळवून दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी समक्ष भेटून कोतवाली पोलिसांचे विशेष आभार मानले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, दीपक दीपक साबळे तन्वीर शेख, जयश्री सुद्रिक सलीम शेख, राजेंद्र फसले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ.राहुल गुंडू यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...