spot_img
अहमदनगर"आयटी पार्कची किरण काळेंनी केली पोलखोल"

“आयटी पार्कची किरण काळेंनी केली पोलखोल”

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सन 2019 च्या निवडणुकीपूव शहरात आयटी पार्क उभारण्यात आला होता. या आयटी पार्कची दुसऱ्यांदा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सोशल मीडियाद्वारे लाईव्ह पोलखोल केली आहे.

तथाकथित आयटी पार्कची बहुतांशी बिल्डिंग रिकामीच आहे. गुटखा, माव्याच्या पुड्यांचा खच बिल्डींगमध्ये आढळून आला. आयटी पार्कच्या उद्घाटनाचा फलक देखील धुळ खात पडल्याचे आढळून आले. सत्ताधाऱ्यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात एमआयडीसीत किती कंपन्या आणल्या? किती युवकांना रोजगार दिला? एमआयडीसी विस्तारीकरणासाठी काय केले? उद्योजकांचे कोणते प्रश्न सोडवले?, असे अनेक जाहीर संतप्त सवाल यावेळी काळे यांनी केले आहेत.

विश्वास जुना, आम्हीच पुन्हा अशी शहरभर पोस्टरबाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कामांची काँग्रेसच्या वतीने सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी जयंती निमित्त किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलखोल केली जात आहे. त्या अंतर्गत काँग्रेसने एमआयडीसीकडे मोर्चा वळवत ही पोलखोल केली आहे. यावेळी माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले, शहराच्या लोकप्रतिनिधी मागील निवडणुकी पूव शहरातील तरुणांना रोजगाराचे दाखवत तीन हजार तरुणांच्या मुलाखती घेऊन नोकऱ्या देणार असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात फार थोड्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. त्यांना सॉफ्टवेअरचे नव्हे तर डाटा एन्ट्रीचे काम दिले गेले. आयटी पार्क मध्ये कॉल सेंटरचे काम केले जात असल्याचा आरोप काळे यांनी केला.

आयटी पार्क एसइझेडची काळे यांची मागणी
नगर शहरातील युवकांच्या रोजगारासाठी मुख्यमंत्र्यांकडे किरण काळे यांनी यापूवच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा स्पेशल इकॉनोमिक झोन (एसईझेड) मंजूर करण्याची मागणी निवेदन पाठवून केली आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या कार्यालयासमोर देखील काँग्रेसने काही महिने पूव आयटी पार्क उभारणी करता आंदोलन केले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....