spot_img
अहमदनगरखासदर विखे पाटलांचे पारनेरकराना मोठे आश्वासन? नेमकं काय म्हणाले, पहा..

खासदर विखे पाटलांचे पारनेरकराना मोठे आश्वासन? नेमकं काय म्हणाले, पहा..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक कोटी ८१ लाखांचा निधी दिला होता. परंतु, पारनेरमध्ये विखे पाटलांचे नाव होईल म्हणून पारनेरच्या लोकप्रतिनिधीने व नगर पंचायतच्या सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेची एनओसी दिली नाही. निधी पाठिमागे पाठविण्याचे पाप येथील सत्ताधार्‍यांनी केले असल्याचा हल्लाबोल खा. विखे यांनी केला. लोकसभेच्या निकालानंतर पाठिमागे गेलेला निधी परत देणार असल्याचे सांगत पारनेरचा पाणी प्रश्न आपण सोडविणार असल्याची ग्वाही खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही, असा संदेश देत आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यत केला. देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. ज्यांनी राम मंदिराचे दिलेले आश्वासन पुर्ण केले त्यांनाच सत्तेवर बसविण्याचा निर्धार देशातील नागरीकांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पारनेर तालुयातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्या गोष्टी तालुयात घडल्या त्यातून युवकांची हेळसांडच झाली. सर्वसामान्य लोकांमध्ये चीड निर्माण झाली. खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागला आहे. विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आला, याचा मोठा आधार पारनेरच्या जनतेला मिळाला असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.

तालुयात काय चालले आहे हे सर्वांना माहीती आहे. अन्याय करणा-या घटना सातत्याने घडत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या शहराच्या पाणी योजनेसाठी येणा-या काळात आपल्याला काम करायचे आहे. शहराची पाणी योजना पुर्ण करण्याचा शब्द मी देत असून, मी जो शब्द देतो तो पुर्णच करतो अशी ग्वाही त्यांनी देतानाच, सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावे, युवकांचे भविष्य खुप महत्वाचे आहे.

त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याला काम करायचे आहे.रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उदिष्ट असून, जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगारची निर्मिती करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, व्यक्तिगत टिका करण्यापेक्षा विकासाच्या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्या आणि विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यकत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...