जळगाव / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यत तेवढीच चर्चा आहे. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढला असल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे.
परंतु आता सरकारच्या या अध्यादेशावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केलाय. सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर किती टिकेल याची शंका आहे. सरकारने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं आहे, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.
सरकारने आजच मरण उद्यावर ढकलावं या दृष्टीने हा अध्यादेश काढलेला दिसतोय. सरकार या अध्यादेशाद्वारे मराठा समाजाची दिशाभूल करतंय का काय? असं होता कामा नये. कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकला पाहिजे.
पण हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याबाबत मला शंका आहे. कारण सगेसोयरे रक्ताच्या नात्यात येत नाही. त्यामुळे सरकार अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल करतंय की काय असं वाटतं. तसं होऊ नये, असं आमदार एकनाथ खडसे म्हणाले.