spot_img
महाराष्ट्रAhmednagar News : मनोज जरांगे यांच्या विजयानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची मोठी प्रतिक्रिया,...

Ahmednagar News : मनोज जरांगे यांच्या विजयानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले यात महसूल विभागाचे योगदान मोठे..

spot_img

शिर्डी / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात महायुती सरकार पहिल्‍यापासूनच सकारात्‍मक होते. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्याच्‍या योगदानातूनच आजचा निर्णय होवू शकला याचा आनंद आणि समाधान आहे. आरक्षणाच्‍या बाबतीत महसूल विभागानेही मोठे काम केले. आजच्‍या निर्णयामुळे आरक्षणाच्या प्रश्‍नासाठी संघर्ष करणा-या सर्वच संघटनांचा मोठा विजय असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

माध्‍यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्‍यात यापुर्वी ५८ मोर्चे निघाले, अनेकांनी या प्रश्‍नासाठी हुतात्‍म्य पत्‍करले. त्‍यांच्‍या परिवारासाठी सुध्‍दा आजचा निर्णय हा आनंददायी ठरला आहे. राज्‍य सरकारने दिलेला शब्‍द पुर्ण झाला असल्‍याचे समाधान व्‍यक्‍त करुन, आरक्षणाच्‍या मुद्या संदर्भात जी तत्‍व ठरली त्‍यात मतभिन्‍नता असू शकते. परंतू इतर समाजाच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्‍यासाठी राज्‍य सरकारने केलेले प्रयत्‍न महत्‍वपूर्ण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्‍या बाबतीत आमचे नेते उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वी सुध्‍दा मोठे काम केले होते. आरक्षणाच्‍या बाबतीत त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली झालेले निर्णय हे न्‍यायालयातही टिकले. मात्र दुर्दैवाने या आंदोलनातून त्‍यांना बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न झाला. केवळ आंदोलनाच्‍या व्‍यासपीठावरून कोणाला बदनाम करण्‍याची षडयंत्र कोणी करत असेल तर त्‍याला मराठा समाजाने बळी पडू नये असे आवाहन करुन,

महायुती सरकारने घेतलेल्‍या निर्णयात मुख्‍यमंत्र्यांसह दोन्‍हीही उपमुख्‍यमंत्र्यांचे योगदान महत्‍वपूर्ण राहीले असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.आरक्षणाच्‍या या सर्व प्रक्रीयेत महसूल खात्‍याने वेळोवेळी मोठे काम केले याचा मला आनंद आहे.

आमच्‍या आधिकारी आणि कर्मचा-यांनी सर्व्‍हेक्षण तसेच कुणबी नोंदी शोधण्‍यासाठी दिलेल्‍या योगदानाला सुध्‍दा तेवढेच महत्‍व दिले पाहीजे. त्‍यामुळे आजच्‍या निर्णयाबद्दल मी महसूल विभागातील सर्व आधिकारी आणि कर्मचा-यांचेही मंत्रीविखे पाटील यांनी अभिनंदन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...