spot_img
ब्रेकिंगकोरठण खंडोबा यात्रेची मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीने सांगता ! ८ लाख भाविकांनी घेतले...

कोरठण खंडोबा यात्रेची मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीने सांगता ! ८ लाख भाविकांनी घेतले दर्शन

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री :
प्रतिजेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाची शनिवारी यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राम्हणवाडा (ता.अकोले) व बेल्हे (जि.पुणे) येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर सांगता झाली. या २५ ते २७ जानेवारी रोजी या तीन दिवशीय यात्रोत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मानाच्या काठ्यांसह लाखो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापुजेनंतर काठ्यांच्या देवदर्शन व कळस दर्शनानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकी नंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली. ही यात्रा तीन दिवस साजरी झाली. याकाळात सुमारे ७ ते ८ लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी, शनिवारी व रविवारी सुट्टी आदींमुळे भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. सुमारे तीन ते चार लाख भाविक यात्रेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित होते.

पहाटे पाच वाजता शनिवारी देवदर्शनाला सुरवात झाली सकाळी खंडोबाची चांदीची पालखी व अळकुटी,बेल्हे,कांदळी, माळवाडी, सावरगांव घुले कासारे कळस येथील मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मंदिरासमोर आल्यानंतर पालखी मानकरांचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला. दुपारी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची शाही मिरवणूक सुरू झाली. या मिरवणूकीत हजारो भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी चारच्या सुमारास दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक समीर बारवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नायब तहसीलदार प्रियंका पाचर्णे, मंडळ अधिकारी सोनाली विधाते चौरे, तलाठी किरण फातले, अध्यक्ष शालिनी अशोक घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, सचिव जालिंदर खोसे, सहसचिव कमलेश घुले, खजिनदार तुकाराम जगताप, यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश फापाळे, सरपंच सौ.सुरेखा वाळूंज, उपसरपंच व विश्वस्त महादेव पुंडे, विश्वस्त पांडुरंग गायकवाड, राजू चौधरी, चंद्रभान ठुबे, अजित महांडूळे, सुवर्णा घाडगे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले, रामदास मुळे यांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली. यावेळी नगर, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यातील लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता.

शासकीय महापुजा व महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन तर बेल्हे काठीने कळस दर्शन घेतले. यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका पार पडल्या. यात्रे दरम्यान मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, संगमनेर, जुन्नर, अकोले येथील मोठ्या संख्येने भाविक कोरठणला आले होते सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते. दोन दिवस सलग सुट्टी असल्याने असल्याने कोरठणला प्रचंड गर्दीचा उच्चांक झाल्याने. भाविकांच्या सोयीसाठी एस टी कडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.

नवीन विश्वस्त मंडळाचे नेटके व उत्तम नियोजन…
श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवा २५ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत पार पडला असून या तीन दिवसाच्या कालावधीत पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन व स्वयं सेविकांच्या मदतीने नीटनेटके उत्तम नियोजन अध्यक्ष शालिनी अशोक घुले व उपाध्यक्ष महेश शिरोळे यांच्यासह विश्वस्त राजेंद्र चौधरी सचिव जालिंदर खोसे, विश्वस्त पांडुरंग गायकवाड, चंद्रकांत ठुबे, सहसचिव कमलेश घुले, खजिनदार तुकाराम जगताप, यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश फापाळे, सरपंच सौ.सुरेखा वाळूंज, उपसरपंच व विश्वस्त महादेव पुंडे, सुवर्णा घाडगे, अजित महांडुंळे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले यांनी पार पडले.

गडावरील विद्युत रोषणाई ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू..
श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या कोरठण गडावर सप्ताह काळात व यात्रोत्सवाच्या काळात आकर्षक विद्युत रोषणाई मंदिर व परिसरात करण्यात आली होती. या विद्युत रोषणामुळे पिंपळगाव रोठा परिसरात हा कोरठणगड रंगेबेरंगी विद्युतमाळांनी अखेर सजला होता. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व लहान मुलांसाठीगडावरील विद्युत रोषणाई ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...