मुंबई / नगर सह्याद्री :
नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ५००० पेक्षा जास्त पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी केंद्रीय रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) असिस्टंट लोको पायलटचे एकूण 5996 पदे भरण्यासाठी 20 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात केलीआहे.
भरतीसाठी पात्र उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 19 हजार 900 रुपये वेतन दिले जाईल. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
तर अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय लिंग श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल. भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी.