कर्जत/ जामखेड । नगर सहयाद्री:-
पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील राशीन खंडणी व मारहाण प्रकरणी पोलिसावर कोणी दबाव आणला, याची चौकशी करावी, तसेच जामखेड तालुयातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात यावी या प्रश्नी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली. या मुद्द्यावरून अधिवेशनात खडाजंगी पाहायला मिळाली.
कर्जत-जामखेड मतदारसंघात राशीनमध्ये (ता.कर्जत) काम सुरू असलेल्या सोलर कंपनीकडून काही स्थानिक गुंडांनी तब्बल १२ टक्के म्हणजेच १५ कोटी रुपये खंडणी मागितली. त्यासाठी कंपनीच्या कर्मचार्यांना मारहाणही केली; परंतु पोलिस कर्मचार्यांवर दबाव असतानाही त्यांनी याबाबत गुन्हा नोंदवून या गुंडांवर कारवाई केली.
या पोलिसांना फोन करून कोणी दबाव आणला याचीही चौकशी करण्याची आणि दबावाला बळी न पडता कारवाई करणार्या प्रामाणिक अधिकार्याला संरक्षण देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेच्या सभागृहात केली.
मतदारसंघातील जामखेड तालुयात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील सराईत आरोपी अद्यापही फारार आहे. त्याला तातडीने अटक करून पीडितेला न्याय देण्याची मागणी पवार यांनी सलग दुसर्या दिवशी विधानसभेच्या माध्यमातून सरकारकडे केली. सरकार या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता आरोपीच्या मुसया आवळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.