spot_img
अहमदनगरजलजीवनचे काम बंद!! 'यांची' कार्यपद्धती संशयास्पद? पिंपळनेर, गटेवाडी ग्रामस्थांनी दिला 'असा' इशारा

जलजीवनचे काम बंद!! ‘यांची’ कार्यपद्धती संशयास्पद? पिंपळनेर, गटेवाडी ग्रामस्थांनी दिला ‘असा’ इशारा

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री|
पारनेर तालुयातील पिंपळनेर व गटेवाडी गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यासंबंधी संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही कसलीच कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे पिंपळनेर गटवाडी ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

गटवडीच्या सरपंच मंगल चंद्रकांत गट व पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे यांनी हे निवेदन दिले. तर दुसरीकडे कोट्यावधी रुपये योजनांवर खर्च होऊन पाणीटंचाईचे सावट या गावांमध्ये निर्माण झाले असल्याचे नागरिक म्हणत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेच्या बाबतीत अधिकार्‍यांना निर्वाणीचा इशारा दिला असतानाही पारनेर तालुयातील अनेक जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

अनेक ठिकाणी कामे बंद आहेत. त्यामुळे या संपूर्ण कामांची चौकशी करावी अशी मागणी गावातून होऊ लागली आहे. गटेवाडीच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम मंजूर असून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम करणार्‍या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम केलेले असून याबाबत दि. १६ जानेवारी २०२४ पत्राद्वारे कळविले होते. पंरतु हे काम ऑगस्ट २०२३ पासून अदयापपर्यंत बंद आहे. या कामाबाबत स्थानिक स्वराज्य संस्था यांना विश्वासात न होता परस्पर बीले अदा केले असल्याचा आरोपही होत आहे. अर्धवट काम सुरू न झाल्यास लोकप्रतिनिधींचा मान न राखल्यास पाणी पुरवठा कार्यालयास टाळे ठोक आंदोलन व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईसार देण्यात आला आहे.

उपअभियंता कुसाळकर यांची कार्यपद्धती संशयास्पद?
पारनेर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा मध्ये कार्यरत असणारे उपअभियंता कुसाळकर यांच्याकडे सुपा व निघोज गटाच्या जलजीवन मिशन पाणी योजनेची जबाबदारी असून या गटातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी जिल्हा परिषदसह पंचायत समितीला लेखी स्वरुपात प्राप्त झाल्या आहेत. परंतु हे उपअभियंता ठेकेदार व सब ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे उपअभियंता कुसाळकर यांचीही चौकशी करावी अशी मागणी सुपा व निघोज गावातील अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...