spot_img
अहमदनगर..म्हणून विवाहितेचा छळ! सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

..म्हणून विवाहितेचा छळ! सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री-
मुलगी झाली म्हणून व आई-वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केला. याप्रकरणी नगर तालुयातील वाळकी येथे माहेरी राहणार्‍या पीडित विवाहितेने बुधवारी (दि. २८) नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अविनाश रामलाल चव्हाण, सासरे रामलाल यादव चव्हाण, भाया अशोक रामलाल चव्हाण, जाऊ संगीता अशोक चव्हाण, पुतण्या अंकित अशोक चव्हाण, सवत वर्षा अविनाश चव्हाण (सर्व रा. टिळेकर वस्ती, मगरपट्टा, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी यांचा विवाह अविनाश चव्हाण याच्या सोबत झाल्यानंतर त्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथे सासरी नांदत असताना अविनाश व इतरांनी त्यांना आई-वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन ये, तुला मुलगी झाली आहे, या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण केली.

तु परत आमच्या घरी नांदायला आली तर जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी उपाशीपोटी ठेऊन मानसिक व शारिरीक छळ केला. तसेच अविनाश याने फिर्यादीसोबत घटस्फोट न घेता वर्षा सोबत दुसरा विवाह केला. इतरांनी अविनाश याला दुसरा विवाह करण्यास मदत केली.दरम्यान यासंदर्भात फिर्यादी यांनी भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने बुधवारी (दि. २८) नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार माने करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...