spot_img
ब्रेकिंगManoj Jarange Patil: धनंजय मुंडे जातीयवाद करत नाहीत, असे वाटले होते पण..?...

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे जातीयवाद करत नाहीत, असे वाटले होते पण..? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले..

spot_img

Manoj Jarange Patil: राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही त विधानसभेला मैदानात उतरेल. लोकसभेला फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल, धनंजय मुंडे जातीयवाद करत नाहीत, असे वाटले होते पण तसे नाही, धनंजय मुंडेही जातीयवाद करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे म्हणाले, पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही.

धनंजय मुंडे जातीय वाद करत नाही मला विश्वास होता. पण आता ते पण करू लागले असे वाटू लागले आहे. मराठा समाजाला सांगतो शांत रहा आणि हे काय करतात लक्ष ठेवा. एक महिना सहन करा, अन्याय होत असेल तर मग मात्र संरक्षण करा.

माझ्या नावाचा काही जण फायदा घेत आहे.इथे येऊन फोटो घेतात आणि तिकडे दाखवतात मलाच कळत नाही. मात्र माझा पाठिंबा कुणालाच नाही. खोटे फोटो दाखवून का समाजाचे नुकसान करत आहात? समाजावर झालेला अन्याय, विसरू नका. एकत्र या एका ताकदीने पाडा.. एका ताकदीने निवडून आणा, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...