Manoj Jarange Patil: राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही त विधानसभेला मैदानात उतरेल. लोकसभेला फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल, धनंजय मुंडे जातीयवाद करत नाहीत, असे वाटले होते पण तसे नाही, धनंजय मुंडेही जातीयवाद करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे म्हणाले, पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही.
धनंजय मुंडे जातीय वाद करत नाही मला विश्वास होता. पण आता ते पण करू लागले असे वाटू लागले आहे. मराठा समाजाला सांगतो शांत रहा आणि हे काय करतात लक्ष ठेवा. एक महिना सहन करा, अन्याय होत असेल तर मग मात्र संरक्षण करा.
माझ्या नावाचा काही जण फायदा घेत आहे.इथे येऊन फोटो घेतात आणि तिकडे दाखवतात मलाच कळत नाही. मात्र माझा पाठिंबा कुणालाच नाही. खोटे फोटो दाखवून का समाजाचे नुकसान करत आहात? समाजावर झालेला अन्याय, विसरू नका. एकत्र या एका ताकदीने पाडा.. एका ताकदीने निवडून आणा, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.