spot_img
ब्रेकिंगभारत कोणाची छेडखानी करत नाही, जर केली तर....; 'ऑपरेशन सिंदूर'वर अण्णा हजारे...

भारत कोणाची छेडखानी करत नाही, जर केली तर….; ‘ऑपरेशन सिंदूर’वर अण्णा हजारे काय म्हणाले पहा

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला चढवला. पहलगाम येथे झालेल्य हल्ल्यामध्ये २६ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भारताकडून काही दिवसांच्या प्रतीक्षनंतर थेट पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकची जगभरात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसगह नागरिकांनीही जवानांनी केलेल्या कामगिरीची कौतुक केले. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया देताना भारतीय लष्कराचं अभिनंदन केले आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळांवर हल्ला केल्यानंतर देशभरातून कौतुक केलं जात आहे. यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया देत लष्कराने केलेल्या कामाचं शब्दांनी कौतुक करता येत नाही इतकं सुंदर काम लष्कराने केल्याचे असं म्हणत लष्कराचे अभिनंदन केलं आहे. भारत स्वतःहून कोणाची छेडखानी करत नाही. मात्र केलं तर सोडायचं नाही ही कारवाई योग्य असल्याचं अण्णांनी म्हटले आहे. काही कारण नसतांना आमचे 26 लोक मारले, त्याचा बदला भारताने घेतला त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही, अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाची हिंमत होणार नाही असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने क्षेपणास्त्र हल्ला करत पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचे तळ उधळून लावले. तसेच ऑपरेशन सिंदूर हल्ल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेत १० मे पर्यंत देशभरातील नऊ विमानतळ बंद केली आहेत. यात जम्मू काश्मीर, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भुज, श्रीनगर, लेह, जामनगर या विमानतळांचा समावेश आहे. एअर इंडियाने १० मे रोजी सकाळी ५.२९ वाजतापर्यंत या नऊ शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. अशात देशातील इतर विमानळांचे संचालन सुरू राहणार असले तरी येथील सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. विमानतळावर इतर सार्वजनिक स्थळांच्या तुलनेत वर्षभर कडक सुरक्षा व्यवस्था असते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...