spot_img
देशPolitics News Today: काँग्रेसच्या अडचणीत वाढ! ईडीच्या आरोपपत्रात 'गांधी' यांचे नाव, नेमकं...

Politics News Today: काँग्रेसच्या अडचणीत वाढ! ईडीच्या आरोपपत्रात ‘गांधी’ यांचे नाव, नेमकं प्रकरण काय?

spot_img

Politics News: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातील चार्जशीटमध्ये ईडीने प्रियांका गांधी यांचे नाव नोंदवले आहे. यामुळे प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी दिल्लीच्या एका रिअल इस्टेट एजंटकडून हरियाणात भूखंड खरेदी प्रकरण चर्चेत आले आहे.

ईडीचे या प्रकरणात म्हणणे आहे, की ज्या इस्टेट एजंटकडून प्रियांका आणि रॉबर्ट वड्रा यांनी जमिनीचा खरेदी व्यवहार केला, त्याच एजंटने एनआरआय बिझनेसमन सीसी थम्पी या व्यक्तीलाही भूखंड विकले आहेत. वड्रा आणि थम्पी यांचे अनेक काळापासून आर्थिक हितसंबंध आहेत. हे मोठे आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण आहे. जे हत्यारांचा डिलर फरार संजय भंडारी याच्याशी संबंधित आहे.

भंडारी याची मनी लॉन्ड्रिंग, परदेशी चलन आणि काळा पैसा कायद्याचे उल्लंघन प्रकरणी गोपनियता अधिनियमांतर्गत अनेक एजन्सी चौकशी करत आहेत. २०१६ मध्ये चौकशीच्या भीतीने तो भारत सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक झाला आहे. थम्पीवर ब्रिटिश नागरिक सुमीत चढ्ढासोबत भंडारीकडून गुन्हा करुन घेण्यास मदत केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणाशी संबंधित पहिल्या चार्जशीटमध्ये थम्पीच्या निकटवर्तीय म्हणून रॉबर्ड वड्रा यांचे नाव घेतले होते. पण पहिल्यांदाच कोर्टात दाखल केलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रियांका गांधी यांच्या नावाचा समावेश केला आहे.

आरोपपत्रात म्हटले आहे, की एचएल पहवा यांनी रॉबर्ट वड्रा आणि थम्पी या दोघांना हरियाणात भूखंड विकले. या खरेदी प्रकरणात बेहिशोबी पैसा देण्यात आला. तसेच वड्रा यांनी जमिनीच्या खरेदीसाठी पूर्ण पैसे दिले नाहीत. पहवा या एजंटने २००६ मध्ये प्रियांका गांधी यांना शेतजमिन विकली आणि पुन्हा २०१० मध्ये त्यांच्याकडून ती खरेदी केली. या व्यवहारात रॉबर्ट वड्रा आणि प्रियांका गांधी यांना ओरोपी दाखवण्यात आले नाही. पण थम्पी आणि वड्रा यांच्यातील आर्थिक हितसंबंध दाखवण्यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्रीचा उल्लेख करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निळवंडे कालव्यांच्या आवर्तनाबाबत मोठी अपडेट; जलसंपदामंत्री विखे पाटील म्हणाले…

लोणी / नगर सह्याद्री - निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना रविवार दि. 20...

जेवणात विष मिसळून 5 जणांचा जीव घेणाऱ्या सुनेला जन्मठेप; कशी घडली होती घटना

रायगड / नगर सह्याद्री : रायगडमधील महाड गावामध्ये घडलेल्या विषबाधा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर...

उधारीच्या पैशांवरून राडा; तरूणासोबत घडले असे…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शिराढोण (ता. अहिल्यानगर) शिवारात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका तरूणावर...

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, तर संघर्ष अटळ…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना...