spot_img
राजकारणPolitical News Today : अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांना गिफ्ट करणार...

Political News Today : अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांना गिफ्ट करणार अलिशान गाड्या

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी मध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार गट भाजप सोबत सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar News) त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले.

निधीवाटपात अजितदादांच्या गटातील आमदारांना झुकते माप मिळत असल्याच्या चर्चाही होत्या. आता अजित पवार गटाकडून आपले जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी कार भेट दिली जाणार आहे.

अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे. अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोर असलेल्या पक्षकार्यालयात काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी आणण्यात आल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी ६० गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण १० लाख ते २२ लाख इतकी असल्याचे समजते.

जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना कोणत्या गाड्या मिळणार?
अजित पवार गटाकडून Scorpio N 4Xplor आणि Bolero Neo या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. शहरातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलेरो निओ ही गाडी दिली जाऊ शकते. तर ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या दिल्या जातील, अशी माहिती आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील सर्व जिल्हाप्रमुखांना गाड्या देण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना गाड्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी अजित पवार गटाकडून १०० वाहने खरेदी केली जाणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...