spot_img
अहमदनगरतालुक्यात 'लाळ्या खुरकुत', लसीकरणाला वेग! 'हे' आहेत लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

तालुक्यात ‘लाळ्या खुरकुत’, लसीकरणाला वेग! ‘हे’ आहेत लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

spot_img

श्रीगोंदा| नगर सह्याद्री-
थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपयोजना म्हणून श्रीगोंदा तालुक्यात जनावरांचे लसीकरण केले जात आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणचे बाजार हे बंद होते त्यामुळे या मोहिमेला खंड पडला होता. आता हिवाळा सुरू होण्यापूर्वी या लसीकरणाला सुरुवात झाली असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.डी एस यांनी सांगीतले.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हे लसीकरण व पशु पालकांना काळजी बद्दलही मार्गदर्शन केले जात आहे. लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य रोग आहे. हिवाळ्यात याची लागण जनावरांना होत असते. तालुक्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने लसीकरण मोहिमेला खंड पडला होता मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला आहे. शिवाय तालुक्यातील साखर कारखाने हे चालू आहेत. कारखान्यावर येणार्‍या जनावरांचे लसीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकूत लसीकरण मोहीम २२ डिंसेबर पासून संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे. गाय आणि म्हैस जनावरांना लाळ खुरकूत लसीकरण करण्यात येत आहे. लाल खुरकूत हा जनावरांतील विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. तालुक्यात २० डिंसेबर अखेर ४९००० जनावरांना लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांना लसीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असुन सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. गाडे यांनी केले.

हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जिभेवर घासली जाते. मात्र असे न करता जर या आजाराची साथ सुरू असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. लाळ्या खुरकत झालेल्या जनावरापासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी. ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत भांड्यांचे निजंतूकिकरण होईल व रोगप्रसार टाळेल. जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही. शेतकर्‍यांनी योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे असे यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नितीन पवार, भाऊसाहेब चव्हाण व केशव घोडेकर यांनी लसीकरणादरम्यान मार्गदर्शन केले.

लाळ्या खुरकुताची लक्षणे

लाळया खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते. दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते. यादरम्यानच्या काळात जनावरांच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येत असुन अपंगत्व सुद्धा येऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...