कान्हूरपठार। नगरसह्याद्री:-
पाच वर्षात हे सगळं राजकारण बदललं विकासाचं राजकारण राहिलं नाही. दहशतीच, दादागिरीच राजकारण आलं, मागील पाच वर्षात कितीतरी जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, लोकसभेच्या निकालानंतर अहंकारी प्रवृत्ती निर्माण झाली होती, परंतु आता विधान मंडळात शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पठार भागाच्या पाणीप्रश्नी लक्ष देणार असल्याचे आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितले.
विश्वनाथ कोरडे युवा मंच व कान्हूरपठार ग्रामस्थांच्या वतीने कान्हूरपठार येथे सत्कार व आभार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, विक्रम कळमकर, सुनील थोरात, बी.एल.ठुबे ,भाजप तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले ,भूमिपुत्र कंपनीचे अध्यक्ष कानिफनाथ ठुबे ,वसंत चेडे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, सुशांत ठुबे, सुयश वाळुंज ,अंकुश ठुबे, बबन व्यवहारे ,भरत ठुबे, स्वप्निल ठुबे, गोकुळ ठुबे, बाळासाहेब नवले, वसंत शिंदे ,अर्जुन गुंड, निकेतन ठुबे, सिताराम देठे ,संदीप मगर, सुनील चिर्के ,रमेश गाडगे, हरेराम खोडदे, प्रसाद सोनावळे, ज्ञानदेव ठुबे, संपत लोंढे ,गोकुळ शिंदे, गोपीनाथ घुले, नंदू सोनावळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी बोलताना आ.दाते सर म्हणाले की मी गेल्या ४० वर्षापासून ज्या ज्या नेतृत्वाबरोबर काम केले त्यांच्यावर जो विश्वास टाकला तसाच विश्वास मी तुमच्यावर टाकला. कान्हूरपठार गाव स्वर्गीय बाबासाहेब ठुबे यांचे आचार विचारांचे आहे आपण दुष्काळी तालुक्यात आहे साधारण दोन तीन वर्षांनी आपल्याला पावसाची टंचाई येते ही परिस्थिती बदलण्यासाठी कै.कॉम्रेड बाबासाहेब ठुबें पासून कै. वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे तसेच विजय औटी यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु मधल्या पाच वर्षात हे सगळं राजकारण बदललं विकासाचं राजकारण राहिलं नाही. दहशतीच, दादागिरीच राजकारण आलं लोकसभेच्या निकालानंतर अहंकारी प्रवृत्ती निर्माण झाली. मागील पाच वर्षात कितीतरी जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले या निवडणुकीत मला उमेदवारी मिळेल का नाही याची खात्री नव्हती परंतु मिळाल्यास लढायचं मी ठरवलं होतं.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघे तेरा दिवस मला प्रचारातला मिळाले. परंतु मला सामान्य माणसाचा सूर कळाला होता ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची मानसिकता मला कळली होती आणि त्याच जोरावर निवडणुकीला सामोरे जायचं मी ठरवलं होतं. माझ्या पक्षाचे नेते माननीय अजित दादा यांनी यापूर्वीही माझ्यावर विश्वास टाकला होता आपण मला मतदान करून माझ्यावर विश्वास टाकला त्यातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही. मी तुमचा कायमचा ऋणी राहील. मी बाजार समितीत आठ वर्ष सभापती म्हणून काम पाहिलं तुम्हा सर्वांना माहित आहे मी सभापती झालो तेव्हा बाजार समितीचे उत्पन्न पंचवीस लाख रुपये वार्षिक असतानाही मी त्या बाजार समितीचे उत्पन्न साडेतीन कोटींवर नेऊन ठेवलं महाराष्ट्रातल्या प्रमुख बाजार समितीमध्ये पारनेरची बाजार समिती नेऊन ठेवली. दोन वर्ष मला जिल्हा परिषदेचा बांधकाम समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु बांधकाम समिती काय असते संपूर्ण पारनेर तालुक्यासह जिल्ह्याला माझ्या कामाच्या माध्यमातून माहिती केले.
पाणी प्रश्न सोडवणार
मला तुम्हाला हेच सांगायचे राजकारणाच्या जागेवर राजकारण करा, पण पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करू नका, कोणीही असो सर्वांना बरोबर घेऊन या प्रश्नावर काम करायचं, सुदैवाने केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी आपणच आहे आता आपल्याला दुसऱ्याची मदत मागण्याची गरज नाही. तालुक्यातही आमदार आपलाच आहे मधल्या काळात जी पोकळी निर्माण झाली तालुक्याच्या सुसंस्कृतीत बदल झाला, पाणी प्रश्न सोडवण या पुढील काळात प्राधान्याने करावे लागेल.
– विश्वनाथ कोरडे ( प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजप )