spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसला मोठा धक्क्का! एका आमदाराने सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता? वाचा...

काँग्रेसला मोठा धक्क्का! एका आमदाराने सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आमदार जितेश अंतापूरकर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. या आमदारांची नेमकी नावं समोर आली नव्हती. मात्र, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता. त्यामुळे काही आमदार पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती.

काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे अंतापूरकर यांनी सांगीतले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहि‍णींना खुशखबर! जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

महाराष्ट्रात थंडी गायब! आजच हवामान कसं? महत्वाची अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशासह राज्यामध्ये...

‘ज्या ठिकाणी येईल आली तेथे येईल बजरंग बली’;अनधिकृत प्रार्थनास्थळावर हातोडा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायक पैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक...

बीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी...