spot_img
आरोग्यपोटाची चरबी कमी करायची? तर 'हे' सूप नक्की प्या, झटपट दिसेल परीणाम

पोटाची चरबी कमी करायची? तर ‘हे’ सूप नक्की प्या, झटपट दिसेल परीणाम

spot_img

नगर सहयाद्री टीम-
सूप हिवाळ्यात सर्वाधीक आवडणारी आणि गरम पाककृती आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाते. हिवाळ्यात सूप तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवण्याचे काम करतात. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ट्रेंडमुळे आजकाल नॉनव्हेज सूपमध्येही अनेक सुपरफूड टाकून तयार केले जातात. तुम्हाला माहीत आहे का, सूप पिण्याचे अनेक फायदे आहेत.

नॉनव्हेज सूप

मांसाहारी सूप हाडांपासून तयार केले जाते. हा एक प्रकारचा पारंपारिक खाद्यपदार्थ आहे, ज्याला शोरबा असेही म्हणतात. हाडे उकळून बनवलेले हे सूप तयार करण्यासाठी पायाचे तुकडे किंवा हाडे वापरतात. कारण ते सहज विरघळत नाहीत. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यातल्या काही भाज्यांचाही वापर करून हे सूप हेल्दी बनवू शकता.

घशाच्या समस्यांना मिळतो आराम

थंड वारे घशातील ग्रंथी कोरडे करण्याचे काम करतात. अशा वातावरणात घसा दुखतो. नॉन व्हेज सूप मधील सोडियमचे प्रमाण तोंड आणि घशातील टॉन्सिल आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.

स्नायू मजबूत होतात

चिकन सूपमध्ये भरपूर प्रोटीन असते. यामुळे स्नायू मजबूत होतात. याशिवाय, एमिनो अॅसिडची उपलब्धता शरीराला बळकट करते आणि टीशूज तयार करते. यामुळे आपले मसल्स अधिक स्ट्रॉंग होतात.

पोटाची चरबी होते कमी

जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर चिकन सूपचे सेवन वाढवा. प्रथिने समृद्ध असल्याने, ते पोटाची चरबी झपाट्याने कमी करण्याचे काम करते. हे सूप भूक नियंत्रित करण्याचे काम करते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...