spot_img
अहमदनगरहिम्मत असेल तर आदित्य चोपडा खून प्रकरणावर बोला!

हिम्मत असेल तर आदित्य चोपडा खून प्रकरणावर बोला!

spot_img

चोपडा खून प्रकरणी फिरोज हवालदार, विजय दिवटे, लाकूडझोडेसर, पोटघन मेजर टोळीचे कॉल डिटेल्स तपासण्याची राहुल शिंदे यांची मागणी!
नगरकरांनो, तुमच्या घराची कडी रात्री अपरात्री सुजय दादा वाजवणार नाही ही आमची गॅरंटी | लबाड लांडग्यापासून सावध!
अहमदनगर | नगर सह्याद्री
अल्पसंख्यांक समजल्या जाणार्‍या मारवाडी समाजातील कडूस (पारनेर) येथील सिव्हील इंजिनिअरीगं झालेल्या आणि ठेकेदारी व्यवसाय करणार्‍या आदित्य चोपडा याच्या खुनाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करतानाच सामान्य चेहरा असल्याचा आव आणणार्‍या लबाड लांडग्याने आधी चोपडा खून प्रकरणावर बोलावे असे जाहीर आव्हान भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिले आहे. या प्रकरणात फिरोज हवालदार, विजय दिवटे, लाकुडझोडे सर आणि पोटघन मेजर या टोळीचे फोन डिटेल्स तपासा आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी करतानाच नगरकरांनी लबाड लांडग्यापासून सावध राहण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे. याशिवाय सुजय विखे पाटील यांच्याकडून रात्री- अपरात्री याआधी आणि यानंतरही तुमच्या घराची कडी वाजवली गेली नाही आणि यापुढेही कडी वाजवली जाणार नाही ही आमची गॅरंटी असल्याची कोपरखिळीही राहुुल शिंदे यांनी मारली.

नगर लोकसभा मतदारसंघातील पारनेर भाजपा व मित्रपक्षांची भूमिका ते ‘नगर सह्याद्री’शी बोलताना मांडत होते. या मतदारसंघातील समोरचा उमेदवार हा पारनेर तालुयातील उमेदवार किती ढोंगी आहे, त्याने गोर गरीब लोकांना कसे छळलेले आहे, किती लोकांना गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त केलेल आहे याची माहिती जनतेसमोर येण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी म्हटले. याची सुरुवात ज्या टपरीवरून चालू झाली त्या टपरीवरून त्याला विजय औटी यांनी त्याला पारनेरच्या राजकारणात आणले. याला पंचायत समितीचे तिकीट दिलं. पंचायत समितीला निवडून आल्यानंतर याला उपसभापती केलं. त्यानंतर त्याला जिल्हा परिषदेची संधी दिली. यानंतर त्याने विजय औटी यांच्या पाठीत खंजिर खुपसले आणि राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन त्यांच्या विरोधात उभा राहिला. औटी यांच्या कारकिर्दीत त्याने मोठी माजा जमवली.

राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीत त्याने विजय औटी यांच्या विरोधात अप्रचार केला. तालुयाच्या जनतेला हा गरीब उमेदवार वाटला. जनतेने त्याला साठ हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं आणि ही सर्वात मोठी चूक जनतेने केली. याच निवडणुकीत जनतेने त्याला निवडणुकीसाठी निधी दिला. निधी देणार्‍यांमध्ये आदित्य चोपडा हा देखील होता. त्याचा खून झाला. त्याचा अद्यापही काहीच तपास नाही. त्या संपुर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची गरज असून आपण तशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली असल्याचेही राहुल शिंदे यांनी म्हटले आहे.

जैन समाजातील आदित्य चोपडा खून प्रकरणात काय म्हणाले राहुल शिंदे?
मागील विधानसभा निवडणुकीत नीलेश लंके याला निधी देणार्‍यांमध्ये आदित्य चोपडा हा जैन समाजातील तरुण देखील होता. कडूस सारख्या छोट्या गावातून सिव्हील इंजिनिअर झालेला व ठेकेदारी व्यवसाय करणार्‍या आदित्यने या निवडणुकीनंतर त्याला कामे मिळतील असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याला कामे मिळाली नाही. मात्र, तरीही त्याला मिळालेल्या कामातून त्याच्याकडे पैसे मागितले जात होते. मी निवडणुकीसाठी पैसे दिले असल्याने आता पैसे नाहीत असे या आदित्य चोपडा याने सांगितले असता त्याचा राग आला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा जीव गेल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असणार्‍या विहीरीत टाकण्यात आला. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला. हे प्रकरण त्यावेळी गाजले होते. जैन समाजातील विविध घटकांनी आणि त्यांच्या समाजातील अनेकांनी या खून प्रकरणाचा तपास लावण्याची मागणी केली. मात्र, हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

जैन- व्यापारी बांधवांनो आठवतोय काय तुम्हाला कँडलमार्च अन् आदित्यचा खून?
नगर- पुणे रस्त्यावर वाडेगव्हाण शिवारात आदित्य चोपडा याचा खून झाल्यानंतर व त्याचा मृतदेह सापडल्यानंतर नगर शहरासह जिल्ह्यातील जैन – व्यापारी- मारवाडी बांधवांनी नगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयावर कँडल मार्च नेला. या मोर्चात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील सहभागी झाले होते. या प्रकरणातील खुन्यांना अटक करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती. जैन- व्यापारी आणि मारवाडी बांधवांनो, या घटनेचं पुढे काय झाले? शांततेचा, अहिंसेचा मार्ग आणि ती शिकवण आनंदऋषी म. सा. यांच्यासह अनेकांनी दिली. मात्र, अन्याय झाला असताना व समाजातील एका तरुणाचा काहीच कारण नसताना खून झाला असताना त्याचा तपास अद्याप लागला नाही की लावू दिला नाही याच्या खोलात जाण्याची गरज आहे. समाजाचा हा कँडलमार्च आणि आदित्य चोपडा तुम्हाला आठवतोय काय, असा सवाल राहुल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

मतदान हीच आदित्य चोपडा यास जैन समाजाची खरी श्रद्धांजली!
आदित्य चोपडा याचा खून झाल्यानंतर व त्याचा मृतदेह सापडल्यानंतर नगर शहरासह जिल्ह्यातील जैन – मारवाडी बांधवांनी नगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयावर कँडल मार्च नेला. या प्रकरणातील खुन्यांना अटक करण्याची मागणी केली आणि संपूर्ण चौकशीत दोषी असणारे आणि खुन्यांना पाठीशी घालणारे या सर्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण कोणी आणि कसे दाबले यासह त्याच्या पाठीमागे असणारा मास्टरमाईंड ओळखा असे आवाहन करतानाच या अपप्रवृत्तीला रोखण्यासाठी मतदान करा आणि तीच आदित्य चोपडा यास खरी श्रद्धांजली असणार असल्याचे राहुल शिंदे यांनी म्हटले आहे.

नगरकरांनो, आदित्यचे खून प्रकरण समजून घ्या आणि आदित्यच्या फोनवर ‘या’ सार्‍यांचे फोन का गेले हेही!
आदित्य चोपडाचा मृत्यू कसा झाला याची एसआयटी चौकशी करतानाच त्याचा घात होता की अपघात होता हे समोर आलं पाहिजे. आदित्य चोपडाला ज्यांनी ज्यांनी फोन केले त्यांचे सगळ्यांचे कॉल डिटेल्स काढा. ठेकेदारीतून आपला कुटुंब चालेल असं वाटणार्‍या आदित्य चोपडाचा घात करण्यात आला असून कडूस गावात जाऊन याची चौकशी केल्यास संपूर्ण पोलखोल होईल असा दावाही राहुल शिंदे यांनी केला. विजय दिवटे याचे फोन आदित्य चोपडाच्या फोनवर का गेले? पोटघन मेजरचे फोन आदित्य चोपडाच्या फोनवर का गेले? फिरोज हवालदार हा आदित्य चोपडा याला सारखे- सारखे फोन का करत होता? याच माजी आमदाराशी संबंधित लाकूडझोडे सर या आदित्य चोपडाला का फोन करत होता? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माजी आमदाराने द्यावे आणि जिल्ह्यातील जनतेने देखील हे आदित्य चोपडा प्रकरण समजून घ्यावे असे आवाहन राहुल शिंदे यांनी केले आहे.

‘ती’ गाडी याच फिरोज हवालदारच्या नावावर; अन् तोच फिरोज आदित्यच्या संपर्कात कसा?
मृत आदित्य चोपडा याच्याकडे ठेकेदारीतील टक्केवारी मागण्याचे काम फिरोज हवालदार हा करत होता असा आरोप करतानाच फिरोज आणि आदित्य या दोघांमधील कॉल डिटेल्स आणि त्यांच्यातील संभाषण तपासल्यास राज्यात मोठा भूकंप घडेल असा दावा राहुल शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, नीलेश लंके हे अलिशान गाड्या वापरत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी ही गाडी फिरोज हवालदार याची असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आता राहुल शिंदे यांनी आरोप केलेला फिरोज हवालदार आणि नीलेश लंके यांनी ते वापरत असलेली गाडी ज्याच्या नावावर असल्याची कबुली दिली तो फिरोज हवालदार हे दोघे एकच असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. त्यामुळे आदित्यच्या प्रकरणात फिरोजची लाय डिटेक्टर चाचणी केल्यास राज्यात मोठा भूकंप घडेल आणि हा चेहरा सामान्य आहे की गुंडाचा हेही समोर येईल असा दावा राहुल शिंदे यांनी केला आहे.

अळकुटीतील युवक नेत्यासोबत यांचे चंदनतस्करीसह गांजाचे रॅकेट
सुपा परिसरातून चंदन तस्करीचं मोठं रॅकेट चालवले जाते. याच्याशी संबंधीत वाघ नावाचा कार्यकर्ता आणि अळकुटी परिसरातील युवक नेता यांनी मिळून हे चंदन तस्करीचं चॅकेट चालवले. आंध्र , कर्नाटक मधील कंटेनर येथे यायचे आणि या कंटेनरमध्ये हाच गरीब संबोधला जाणारा माजी आमदार स्ंवत: उभे राहून हे कंटेनर भरून द्यायचा. यातून मोठी बेनामी संपत्ती त्याने जमवली. वाळू माफिया आणि चंद्दन तस्कर यांना हाताशी धरत याच महाशयांनी पुणे ते संभाजी नगर जिल्हा हद्दी पर्यंत गांजा पार्सल करून द्यायची जबाबदारी पार पाडली असा आरोपही राहुल शिंदे यांनी केला. तत्कालीन आमदार विजय औटी यांच्या सत्तेचा फायदा याने फक्त तस्करी करता उठवला.

जयश्री औटी यांना पाडण्यासाठी कोवीडचे जनतेचे पैसे कोणी वाटले?
भाळवणी येथील कोवीड सेंटरला जनतेने मोठी आर्थिक मदत केली. कोट्यवधी रुपयांचा निधी त्याच्या प्रतिष्ठानला रोख आणि बँक खात्यावर जमा झाला. त्या पैशाचा हिशोब आजही जनतेसमोर यायला तयार नाही. ज्या विजय औटी यांनी त्याला पानटपरीवरून थेट राजकारणात आणले त्याच विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनी त्यास मीठ खाऊ घातले. त्यांचे अन्न हा हजारदा जेवला. मात्र, त्यांच्या मीठाला देखील हा जागला नाही. राजकारणात भूमिका वेगळ्या असतात हे मान्य. मात्र, जनतेने कोवीडसाठी दिलेला पैसा याने नगरपंचायत निवडणुकीत त्याच जयश्री औटी यांना पाडण्यासाठी प्रत्येक मतामागे दहा हजार रुपये याप्रमाणे वाटून आपली कृतघ्नतेची पायरी दाखवून दिल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. जयश्री औटी यांना पैसे वाटून पाडल्याबद्दल हंग्यातील एकाला बुलेट तर एकाला आयफोन बक्षिस यांनीच दिला असेही शिंदे यांनी आरोपात म्हटले.

राळेगणसिद्धीसह हिवरेबाजारची निवडणूक यांनीच लावली!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या गावची बिनविरोध झालेली ग्रामपंचायत निवडणूक यांनी पुन्हा लावली. त्यांच्या विरोधात पॅनल तयार केले. त्यासाठी पैसे दिले. त्याचवेळी दुसरवीकडे आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लावण्याचे पाप देखील यांनाच जाते. त्यामुळे जनतेने या दोन गावांमध्ये टोळी निर्माण करणारा ओळखावा. त्याच्या टोळ्या जिल्ह्यातील गावागावात तयार होण्याआधी ही प्रवृत्ती संपवायची हीच वेळ असल्याचेही राहुल शिंदे यांनी म्हटले आहे.

दलालीचे रॅकेट चालवणारा आणि दाताला रक्त लागलेल्या लांडग्यापासून सावध रहा!
गरिबीचे ढोंग, पत्र्याच घर सांगणार्‍यांनी पारनेरमध्ये धुरपते यांचे एक कोटींचे गाळे कसे घेतले. ते पैसे कोठून आले हे जाहीरपणे सांगावे! त्याचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे आहेत. हा रक्ताला चटावलेला लांडगा असून याच्या दाताला रक्त लागले असल्यानेे याच्या पासून सावध राहा असे आवाहन राहुल शिंदे यांनी केले. पारनेर तालुक्यातील जवळ्यात मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यात त्या मुलीची हत्या झाली. त्याच्या चौकशीत त्या गावात एक वेगळेच रॅकेट सापडले. त्यातून भळप या पोलिस अधिकार्‍याला हाताशी धरत त्या गावातील अनेकांना लुटले आणि त्या प्रकरणात भळप याच्यासोबत यानेही दलाली कशी खाल्ली हे जवळेकरांना जाऊन विचारा असे आवाहनही राहुल शिंदे यांनी नगरकरांना केले.

खुनाची धमकी देणारा नाना गाडगे आजही कोण पाळतोेय?
विरोधी उमेदवाराला खूनाची धमकी देणारा आणि त्याच्यावर या अनुषंगाने गुन्हा दाखल होताच तो आमचा कार्यकर्ता नाही, त्याचा आणि आमचा काहीच संबंध नाही असे त्याची पिलावळ सांगत सुटली! आज हाच नाना गाडगे बाहेर येताच कोणाचा उदो उदो करतोय आणि कोणाच्या पोस्ट टाकतोय यावरून नाना गाडगे याला धमकी द्यायला लावणारे कोण हे स्पष्ट झाले अहे. नाना गाडगेला संभाव्य खुनासाठी रिव्हॉल्वर देणारा आणि ते पाळणारे कोण हे लपून राहिलेले नाही. असे अनेक नाना गाडगे आहेत आणि ते या निवडणुकी नंतर पसार झालेले दिसतील असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

नगरकरांनो हा तुम्हाला उल्लू बनवू शकतो, पारनेरकरांना नाही!
आतापर्यंतचा याचा सारा प्रवास हा उल्लू बनवत झाला आहे. मदत करणार्‍यांनाही याने सोडलेले नाही. त्यांच्या कुटुंबात देखील याने माणसात माणूस ठेवला नाही. या निवडणुकीत हा कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा सह सर्वांना उल्लु बनवू शकतो, पण पारनेरच्या जनतेला हा उल्लू बनवू शकत नाही असा विश्वास राहुल शिंदे यांनी व्यक्त केला.

वाळू तस्करी आड येणारा महसूल अधिकारी पीआय घनश्याम बळप समोर तुडवला; त्याच पीआयला विमानातून वैष्णवदेवी दर्शनची बक्षिसी!
भोळा, सामान्य कुटुंबातील चेहरा ही नौटंकी आहे. पोलिसांचा बाप काढण्यापर्यंत मज ल जातेच कशी? जिल्हाधिकार्‍यापासून ग्रामपंचायत शिपायाचा सन्मान करणारा उमेदवार एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला जिल्हाधिकार्‍यांना ऐेकेरी बोलणारा! यातच त्यांचे डिएनए समजून येतात! वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे सांगितले जाते. इथे उलटेच घडत आहे. त्यांच्या पापाचा घडा घरा भरलेला आहे. कोव्हीड सेंटर मोठे प्रकरण आहे. या सेंटरमध्ये वाळवण्याच्या सरपंचाचा जेसीबी तास मध्ये वाळूृ तस्करीत पकडण्यात आला. ज्याने पकडला त्या महसूल अधिकार्‍याला याच कोवीड सेंटरमध्ये घेऊन कोणी कोणी चोपले? घनश्याम बळप या पोलिस अधिकार्‍यासमोर त्या अधिकार्‍याला चोपले आणि त्याने काहीच करू नये म्हणून त्याच बळप या पोलिस अधिकार्‍याला विमानात बसवून वैष्णवदेवी यात्रा घडवल्याची फोटो सर्व जनतेने पाहिले आहेतच असेही राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...