spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्रात हुडहुडी!! थंडीची लाट.., हवामान विभागाचा पुढचा अंदाज काय?

महाराष्ट्रात हुडहुडी!! थंडीची लाट.., हवामान विभागाचा पुढचा अंदाज काय?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
उत्तरेकडून येणार्‍या वार्‍याच्या प्रभावाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात मोठा बदल झाला आहे. गेल्या ४८ तासांपासून राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहील.

संपूर्ण उत्तर भारतात कडायाची थंडी आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये धुके आणि थंडीची लाट आहे. दिल्लीतील तापमान ४ अंश सेल्सिअसच्या खाली असून राजधानीत दाट धुके आणि शून्य दृश्यमानतामुळे अनेक विमान उड्डाणे आणि रेल्वे उशिराने धावत आहेत. जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीची शयता आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणात कोल्ड वेव्ह अलर्ट जारी केली आहे.

बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची आणि अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये विविध ठिकाणी गारपीटची शयता आहे. अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, तामिळनाडूचा दक्षिण भाग, लक्षद्वीपमध्ये हलया पावसाची शयता आहे. २१ जानेवारीपर्यंत देशातील विविध भागांत थंडीच्या लाटेची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...