spot_img
ब्रेकिंगबोल्हेगाव उपनगरात रात्री भयंकर घटना; प्रसिद्ध ठेकेदारासोबत घडलं असं काही..

बोल्हेगाव उपनगरात रात्री भयंकर घटना; प्रसिद्ध ठेकेदारासोबत घडलं असं काही..

spot_img

Crime News : बोल्हेगाव उपनगरातील भारत बेकरीजवळ 4 मे च्या रात्री साडेआठच्या सुमारास एका ठेकेदारावर चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. पवन रमेश शिंदे (वय 25, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश शिरसाठ, सुलेमान शेख, राहुल साबळे आणि रावण (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी यांनी एकत्र येऊन पवन शिंदे व त्यांचा मित्र शुभम कळसगर (रा. गांधीनगर) यांच्यावर लाथाबुक्यांनी मारहाण केली.

मागील भांडणाचा राग मनात धरून त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवन शिंदे त्यांच्या दुचाकीवरून मित्रासोबत फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असता, भारत बेकरी जवळ संशयित आरोपींनी रस्त्यात अडवून अचानक हल्ला केला.

यश शिरसाठ आणि सुलेमान शेख या दोघांनी कोयत्याने हल्ला करून पवनच्या डाव्या हातावर गंभीर जखम केली. पवन याला तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...