spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये 'हिट अँड रन'; भरधाव काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने दोन जणांन उडवलं..

अहमदनगरमध्ये ‘हिट अँड रन’; भरधाव काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने दोन जणांन उडवलं..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हिंट अॅण्ड रन चा प्रकार घडला. पिक्चर स्टाईलने भरधाव आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने हरेगाव येथे मतमाऊली यात्रेसाठी चाललेल्या भक्तांच्या मोटार सायकलला धडक देवून दोघांना गंभीर जखमी केले. स्कॉर्पिओला गुंतलेली मोटारसायकल सुमारे एक किलोमीटर ओढत नेवून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु भोकर, मुठेवाडगाव शिवारातील नागरीकांनी एकमेकांना संपर्क करत त्या स्कॉर्पिओचे अनेकांनी शुटींग काढल्याचे लक्षात आल्याने सदर गाडी भोकर मुठेवाडगाव शिवारात सोडून चालक पसार झाला.

श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भोकर शिवारात काल नेवासाकडून भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (क्र. एमएच २० जीटी ३३३०) हिने आपल्या पुढे चाललेल्या मोटार सायकल (क्र.एमएच १७ सीटी ६७४७) हिला जोराची धडक दिली. यामध्ये मोटार सायकलवरील दोघे तरूण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

स्कॉर्पिओ चालकाने मोटारसायकल खोकर फाटा येथून खानापूर रोडने सुमारे एक किमीपर्यंत असलेल्या वस्तीपर्यंत ओढून नेली. तेथून मुठेवाडगावमधून भोकररोडने निर्जन ठिकाणी स्कॉर्पिओ सोडून गाडी चालक व इतरजण पसार झाले. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्कॉर्पिओ सापडली आहे. नागरिकांनी जखमींना साखर कामगार वेथे उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास सुरू तालुका पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कालच भेटलो, जेवलो… गप्पा मारल्या, अजूनही विश्वास बसत नाही; आमदार कर्डिलेंच्या निधनावर सुजय विखेंची प्रतिक्रिया

आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला ; डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली...

बकऱ्या चारण्यासाठी गेलेलया दिव्यांग मुलीसोबत घडलं भयंकर; डोंगरावर पाच आरोपींचे ‘तसले’ कृत्य..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जमिनीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून पाच नातलगांनी दोन सख्ख्या...

जिल्हा रुग्णालयात ‘शॉक’ देणारी घटना; सुरक्षेचा फज्जा!, चोरट्यांनी साधला डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरक्षेचा फज्जा उडवणारी...

लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी? ऑक्टोबरचा हप्ताकडे साऱ्यांचे लक्ष!

मुंबई। नगर सहयाद्री:- महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थींना सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० चा...