spot_img
अहमदनगरविधानसभा निवडणुका कधी? CM शिंदे यांनी सांगितली महत्वाची माहिती..? महायुतीच्या फॉर्मुल्यावर मोठं...

विधानसभा निवडणुका कधी? CM शिंदे यांनी सांगितली महत्वाची माहिती..? महायुतीच्या फॉर्मुल्यावर मोठं वक्तव्य…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यांनी रविवारी वर्षा निवसस्थानावर पत्रकारांशी संवाद साधला. चर्चेदरम्यान, निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली. याबरोबरच, निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने त्याआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला ठरवला आहे. जागावाटपाचे निकष लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता यावर आधारित असतील, असे शिंदे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेना पक्षाने १५ पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता, याचा उपयोग विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात येईल. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीत जागावाटपाच्या अंतिम निर्णयाची घोषणा लवकरच केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. निवडणुकांचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाचा असेल, देखल त्यांनी नमूद केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...