spot_img
आरोग्यHealth Tips : हृदयरोग कमी करण्यासह फ्लॉवरचे आहेत 'हे' ५ आश्चर्यकारक...

Health Tips : हृदयरोग कमी करण्यासह फ्लॉवरचे आहेत ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे

spot_img

नगर सहयाद्री टीम : फ्लॉवर ही भाजी सर्वसामान्यांच्या जेवणात नियमित वापरली जाते. ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक अशी आहे. ही भाजी हृदयरोगासारख्या आजारांमध्ये लढण्यासाठी प्रभावी ठरते. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. जाणून घेऊयात फ्लॉवरचे फायदे –

१) अनेक गोष्टींचा शरीरास पुरवठा –
फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील ७७ टक्के, व्हिटॅमिन Kचे २० टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ६ असतं. या सवांचा व्यवस्थित पुरवठा शरीरास होतो.

२) वजन नियंत्रणात ठेवते –
फ्लॉवरमध्ये इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत कार्बोहायटड्रेट अधिक असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ही भाजी फायदेशीर आहे. १०० ग्रॅममध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरी आणि ३-५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

३) पचनक्रिया सुधारते –
फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रियेच्या सुरळित कामासाठी आवश्यक आहे. फायबरयुक्त भाज्यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

४) कॅन्सरशी लढण्यास प्रभावी –
फ्लॉवरमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडेन्ट असतात, ज्यामुळे कर्करोगास कारणीभूत घटकांची प्रभावीता कमी होते. फ्लॉवरसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असलेलं ग्लूकोसायनोलेट्स डीएनएला नुकसानापासून वाचवतात आणि पेशींचं आरोग्य चागंलं राखण्यास मदत करतात.

५) हृदयरोग –
फ्लॉवरच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारतं. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी ६ रक्तातील होमोसिस्टीन नियमित करण्यास मदत करते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरोग्य केंद्रात स्टिंग ऑपरेशन! रुग्णांची हेळसांड समोर? आक्रमक ग्रामस्थांनी दिला ‘मोठा’ इशारा

पारनेर। नगर सहयाद्री पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळावी या...

ग्रामपंचायतमध्ये राडा! माजी सरपंचासह सदस्यावर गुन्हा दखल, नेमकं प्रकरण काय?

पारनेर। नगर सहयाद्री पारनेर तालुयातील वारणवाडी येथील सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेत गोंधळ घालत कागदपत्रे...

सरकारचे डाव लिहून ठेवलेय! जरांगे पाटील स्पष्टच म्हणाले, समाजाला सांगणार…

बीड। नगर सहयाद्री मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरलं आहे. मनोज जरांगे...

महायुतीच ठरलं! लोकसभेच्या उमेदवारांची यादी व्हायरल, शिर्डीमधून आठवले, नगर मधून…

मुंबई। नगर सहयाद्री पुढील आठवड्यात आचार संहिता लागून लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होवू शकतात...