spot_img
अहमदनगरAhmednagar News : दारूची चोरटी वाहतूक पकडली, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News : दारूची चोरटी वाहतूक पकडली, लाखोंचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : कोतवाली पोलीसांनी कायनेटिक चौकात चोरटी दारू वाहतूक पकडली. ट्रकमधून आरोपी विदेशी दारू घेऊन चालला होता. अरुण सुखदेव लंके (रा.चिखली, ता.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील १० लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला.

अधिक माहिती अशी : ११ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, एक माल वाहतूक ट्रकचा चालक ट्रकमधून काही देशी विदेशी दारुची बेकायदा, विनापरवाना वाहतूक करत आहे. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार कायनेटिक चौकात सापळा लावला. त्या ट्रकची तपासणी केली असता

केबीनमध्ये सात विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील मालवाहतूक ट्रक व विदेशी दारु असा १० लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुददेमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत सुजय हिवाळे, अभय कदम, रिंकू काजळे यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात मातब्बर पुढाऱ्यांना धक्का; सरपंच पद झाले आरक्षित, या गावांत ‘महिलाराज’

सुनील चोभे / नगर सह्याद्री - थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण...

अकोळनेर नगरीत भक्तीचा महापूर; दिड लाख भाविकांना पाच लाख पुरणपोळ्याचा महाप्रसाद

जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता सुनील चोभे / नगर...

अहिल्यानगरमध्ये ऑनलाईन वेश्याव्यवसाय; पोलिसांची मोठी कारवाई..

Ahilyanagar Crime: शिर्डीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गैरकृत्याचा प्रकार सुरु होता. ओंलीने पद्धतीने बुकिंग...

जामखेडमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; अधिकाऱ्यांकडून केले असे, पहा नेमकं काय घडलं

जामखेड / नगर सह्याद्री : शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात...