spot_img
आरोग्यHealth Tips : हिवाळ्यात सांधेदुखीचा होतोय त्रास?चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ

Health Tips : हिवाळ्यात सांधेदुखीचा होतोय त्रास?चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ

spot_img

Health Tips :
नगर सह्याद्री टीम : अनेकांना हाडे दुखणे किंवा सांधे दुखण्याचा त्रास असतो. हा आजार असणाऱ्या लोकांसाठी हिवाळा हा अत्यंत वेदनादायी जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या मोसमात वेदना कमी करण्यासाठी सांधे मालिश केले पाहिजेत. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम केला पाहिजे. आपल्या दैनंदिन आहाराशी संबंधित गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. सांधे आणि हाडांमध्ये वेदना किंवा कडकपणा असल्यास काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

मीठ: आर्थरायटिस फाउंडेशनच्या मते, जेवणात कमी किंवा योग्य प्रमाणात मीठ शरीरात कॅल्शियमची कमी पातळी रोखू शकते. यामुळे ऑस्टिओपोरोसिस (हाडांचे विकार) आणि फ्रॅक्चरहोण्याचा धोका देखील कमी होईल. मीठामुळे शरीरात फ्लूड रिटेंशन टिकवून ठेवतात, ज्यामुळे सांधे सूज आणि वेदना समस्या वाढतात.

साखर : कोला, मिठाई, कृत्रिम रस, ब्रेड किंवा रिफायनरी उत्पादने यासारख्या बेकरी वस्तू टाळणे देखील महत्त्वाचे आहे. शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने सांधेदुखीच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. अशा गोष्टी टिशू इन्फ्लेमेशन आणि सांधेदुखीला वाढ करतात.

लाल मांस : मटणात भरपूर सॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड्स आढळतात. या दोन्ही गोष्टींचा शरीरातील इंफ्लेमेशनशी थेट संबंध आहे. ते खाल्ल्याने सांध्यातील जडपणा वाढतो आणि वेदनाही वाढतात.

ग्लूटेन :  गहू आणि बार्ली हे ग्लूटेनचे चांगले स्रोत मानले जातात. जर एखाद्या व्यक्तीला ग्लुटेनची ऍलर्जी असेल तर त्यांनी या सर्व गोष्टी खाणे टाळावे. ग्लूटेन शरीरात इंफ्लेमेशन होण्याच्या समस्येस प्रोत्साहन देते. जर तुम्हाला हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर लगेचच ग्लूटेन आहारापासून दूर राहा.

दारू : सांधेदुखीच्या रुग्णांना दारूमुळे मोठी अडचण होते. 278 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या पाठीच्या कण्याच्या संरचनेला हानी पोहोचते. अल्कोहोलमुळे ऑस्टियोआर्थराइटिसचा धोकाही वाढतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...