spot_img
आरोग्यHealth Tips : हिवाळ्यात 'अशा' पद्धतीने खा हरभरा, बाबा रामदेव म्हणतात मधुमेह...

Health Tips : हिवाळ्यात ‘अशा’ पद्धतीने खा हरभरा, बाबा रामदेव म्हणतात मधुमेह येईल नियंत्रणात

spot_img

नगर सह्याद्री टीम : सध्या भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. मधुमेहाच्या आजारात रक्तातील साखरेची पातळी योग्य राखणे फार महत्वाचे आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, एकाधिक अवयव निकामी होणे आणि स्ट्रोक यांसारख्या अनेक गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितींचा धोका वाढतो. रक्तातील उच्च साखरेची पातळीला वैद्यकीय भाषेत हायपरग्लायसेमिया म्हणतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अन्नाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर मोठा परिणाम होतो.

त्यामुळे मधुमेही रुग्णांनी आहाराबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते, यापैकी एक म्हणजे हरभरा. थंडीच्या काळात बाजारात चणे सहज उपलब्ध होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी चणे हे सुपरफूडपेक्षा कमी नाही.

हरभरा : खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने समृद्ध असणाऱ्या हरभऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खूप कमी असतो. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध, हरभरा जीवनसत्त्वे ए, बी, सी, डी, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियमने समृद्ध आहे. हे हृदयासाठी खूप चांगले मानले जाते.

मधुमेहाच्या रुग्णांनी ‘अशा’ प्रकारे हरभरा खावा : स्वामी रामदेव यांच्या मते, मधुमेही रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे हरभरा खाऊ शकतात. यासाठी मधुमेही रुग्ण सकाळी मूठभर अंकुरलेले हरभरे खाऊ शकतात. याशिवाय हरभऱ्याचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

हरभरा पाणी बनवण्यासाठी 2 चमचे हरभरे एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. नंतर हे पाणी गाळून प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हरभरा उकडून किंवा सॅलडच्या स्वरूपातही खाऊ शकता. जेवणात गव्हाच्या पिठाऐवजी हरभरा भाकरी खाऊ शकतो. याशिवाय हरभऱ्याची भाजी करूनही सेवन करता येते. काळ्या हरभऱ्यामध्ये असलेले प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...