spot_img
अहमदनगरAhmednagar: मैत्रीबरोबर कॅफेतून बाहेर पडला..पुढे नको तोच प्रकार घडला! प्रोफेसर चौकातील घटना

Ahmednagar: मैत्रीबरोबर कॅफेतून बाहेर पडला..पुढे नको तोच प्रकार घडला! प्रोफेसर चौकातील घटना

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दांडयाने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सलमान फारुक शेख (वय २२, रा. सर्जेपुरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सलमान तिच्या मैत्रिणीबरोबर प्रोफेसर चौक येथे नाष्टा करण्यास गेला होता. तेथील कॅफेच्या बाहेर येत असताना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून इतरांना बोलवून घेतले.

चौघांनी त्याला मारहाण केली व तुला पोलिस स्टेशनला नेतो, असे म्हणून जबरदस्ती दुचाकीवर बसवून कल्याण रोडने पुलाच्या पुढे नेले. तेथे आणखी सहा ते सात अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. या सर्वांनी त्याला लाकडी दांडयाने व कोयत्याने मारहाण केली. तसेच मोबाईल व दोन हजार रुपये काढून घेत काट्यात टाकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर)...

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...