spot_img
राजकारणPolitical News : खासदारांच्या मिमिक्री नाट्यानंतर पंतप्रधान मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन, 'मी तर...

Political News : खासदारांच्या मिमिक्री नाट्यानंतर पंतप्रधान मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन, ‘मी तर २० वर्षांपासून असा अपमान सहन करतोय…’

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : विविध मुद्यांवरून संसदेतील राजकीय वातावरण तापले आहे. संसदेत झालेल्या घुसखोरीवरून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या जवळपास १४१ खासदारांना निलंबित केले आहे.

या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एका खासदाराने थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवण्याची घटना घडली. उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्तीची खिल्ली उडवली गेल्याने या कृतीची देशभरात मोठी चर्चा झाली. सत्ताधारी भाजपच्या विविध नेत्यांनी या कृतीचा निषेध करत विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फोनवरून संवाद झाला. संसद परिसरात खासदारांनी केलेली घृणास्पद कृती वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मागील २० वर्षांपासून सातत्याने असा अपमान सहन करत आहे. मात्र भारताच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत संसद परिसरात अशी कृती होणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले,” अशी माहिती उपराष्ट्रपतींनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवरून दिली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाविषयी अधिक माहिती देताना जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की, “काही सदस्यांच्या अशा कृतीने मी माझ्या जबाबदारीपासून मागे हटणार नाही. संविधानातील मूल्यांच्या प्रती माझी मनापासून निष्ठा आहे. कोणताही अपमान मला माझ्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नसल्याचं मी पंतप्रधानांना सांगितलं.”

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...