spot_img
महाराष्ट्रशरीरसुखाची मागणी केली, नकार देताच खून केला.. मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फडच...

शरीरसुखाची मागणी केली, नकार देताच खून केला.. मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फडच पेटवला

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री : समाजात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. खून, हाणामारी अशा घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. आता एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. शरीर सुखाची मागणी केली व तीने नकार देताच नराधमाने तिचा गळा आवळून खून केला. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फड पेटवून दिला. हा प्रकार गुरुवारी रात्री भादवण या गावात घडला.

अधिक माहिती अशी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती. गुरुवारी (दि २८) रोजी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील (वय ३५ रा. भादवण) याने महिलेला उसाच्या फडात नेत शरीर सुखाची मागणी केली.

त्यावेळी पीडितेने विरोध केल्याने संशयित आरोपी योगेशने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. ही घटना कोणाला कळू नये यासाठी सदरमहिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला आणि उसाचा फड पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उसाला आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी ते विजवण्यासाठी धाव घेतली.

आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशीरा सदर महिलेची ओळख पटली. सीसीटीव्ही व इतर काही गोष्टींच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील याला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेत चौकशी केली. त्याने याबाबत कबुली दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...