spot_img
राजकारणविजय आपलाच होईल असं समजू नका...; देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय आहे...

विजय आपलाच होईल असं समजू नका…; देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय आहे वक्तव्य ?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने तर कम्बर कसली आहे. त्यात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

पक्षाच्या विजयाबद्दल आत्मसंतुष्ट न होण्याचा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घेण्याचा सल्ला फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपाचा विजय होणारच आहे हे समजून प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवर काम करणं थांबवू नका असा सूचक इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सर्वसामान्य आणि गरिबांशी संवाद साधा जे भाजपाचे मतदार आहेत. आपला विजय निश्चित आहे असा समज करून प्रयत्न करणे सोडू नका. तिकीट कुणाला मिळेल याची चिंता करू नका. भाजपा कार्यकर्त्यांनी गरीब,

शेतकरी, महिला आणि युवकांवर लक्ष केंद्रीत करा. समाजातील या चार घटकांना नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ झाला आहे. जातीबाबतचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी जातीचा विचार करू नका असं त्यांनी सांगितले. भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....