spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation:महाप्रलय!! पुण्याकडुन-मुंबईकडे, उपोषण रोखण्यास 'हायकोर्टाचा' नकार?

Maratha Reservation:महाप्रलय!! पुण्याकडुन-मुंबईकडे, उपोषण रोखण्यास ‘हायकोर्टाचा’ नकार?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी महामोर्चा काल पुण्यात पोहोचला होता. महामोर्चा आज पुण्याकडुन- मुंबईच्या दिशेने कूच करेल. २६ जानेवारी रोजी मुंबईत पोहचण्याचा जरांगे पाटील निर्धार आहे.

बुधवारी मध्यरात्री मराठ्यांचा महाप्रलय पुण्यात धडकला. महामोर्चाचा आजसहावा दिवस आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती. या मुदतीमध्ये सरकारने या बाबतनिर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आक्रमक झाला आहे. हे वादळ पुण्याकडुन-मुंबईकडे सरकले असून शेकडो मराठे या आंदोलनात एकवटू लागले आहे.

उपोषण रोखण्यास ‘हायकोर्टाचा’ नकार?
मनोज जरांगे पाटील यांचा महामोर्चा मुबंईत २६ जानेवारीला पोहचणार असून आझाद मैदान उपोषण करणार आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण आंदोलन करण्यापासून मनोज जरांगेंना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. सीएएविरोधात नवी दिल्लीतील शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत न्यायालयाने स्पष्ट केले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...