spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: शासन आपल्या दारी; ‘व्हाया’ सावेडी सर्कल! अँटी करप्शनच्या जाळ्याचा...

Ahmednagar News Today: शासन आपल्या दारी; ‘व्हाया’ सावेडी सर्कल! अँटी करप्शनच्या जाळ्याचा ताजा डाग

spot_img

अँटी करप्शनच्या जाळ्याचा ताजा डाग | तरीही ‘प्रोटोकॉल’ अन् ‘व्यवस्था’ या नावाखाली राजरोस ‘दरोडे’!
अहमदनगर | नगर सह्याद्री
सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या तातडीने मार्गी लागाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने अनेक निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी आणि जनतेचे प्रश्न कीती आणि कशी होतेय याबाबत मतमतांरे आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यात महसूल यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे दिसत असतानाच नगर शहरात नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘शासन आपल्या दारी आहे, मात्र ते ‘सावेडी सर्कल’ मार्गे’, अशो उपरोधीक चारोळी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

महसूल विभागाशी निगडीत सावेडीचा कलेक्टर झालेल्या या महिला अधिकार्‍याच्या विरोधात अनेक तक्रारी यापूर्वी देखील करण्यात आल्या होत्या. काही वर्षापूर्वी कर्मचारी म्हणून नोकरीस असताना एक वरिष्ठ ‘निवासी’ अधिकार्‍याला मोहजालात अडकविण्यात त्या यशस्वी झाल्या. भानगडींचा बुरखा पुराव्यासह समोर येताच त्या अधिकार्‍याला बदलीच्या नामुष्कीला सामोरे लागले. मात्र, त्यानंतरही ‘देव’ म्हणवून घेत ‘कात’ टाकणार्‍या या कर्मचार्‍याने अनेकजण ‘गळाला’ लावलेच!

महसूल विभागात लिपीक म्हणून नोकरीस लागल्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीने काही वर्षांपूर्वी ‘नालेगाव’ ची जहागीरी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. जहागीरी मिळताच आधीच रुबाबात असणार्‍या या कर्मचार्‍याचा रुबाब आणखी वाढला. त्यातून कामाच्या मोबदल्यात दाम अन् काम मोठं असेल तर त्या बदल्यात सराफाच्या दुकानातील ‘सोन्याचं गिप्ट’ घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यातून व्हायचे ते झालेच! लाचलुचपत विभागाकडे तक्रार झाली आणि अँटी करप्शनच्या अधिकार्‍यांनी १५ हजाराची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले. लाचखोरीचा मोठा शिक्का माथी असताना त्यांची नियुक्ती अकार्यकारी पदावर होणे आवश्यक होते.

मात्र, मायाजाल इतकं भयानक आहे की त्यांनी पुन्हा काहींना भुरळ घातली. त्या भुरळीत काही दिवाणे झाले! त्यातूनच काही महिन्यांपूर्वी त्यांना महसूल विभागातील क्रीम पोस्टींग समजल्या जाणार्‍या ‘सावेडी’ची जहागीरी बहाल झाली. या आदेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या! दिवसा- रात्री- अपरात्री ‘प्रोटोकॉल अन् त्यातील ‘व्यवस्था’ हे सारे मलाच पहावे लागते असं जाहीरपणे आता त्या बोलू लागल्या आहेत. काहींनी नेमकेपणानं ‘प्रोटोकॉल’ अन् ‘व्यवस्था’ या शब्दांवर आता जोर देणे सुरु केले आहे. या दोन शब्दांवर जोर देऊन बोलताना संबंधितांचे ‘कुत्सीत’ हसणं बरेच काही सांगून जात आहे.

‘महसूल‘ची नामुष्की अन् बदनामी टाळण्यासाठी खा. विखेंना साकडे!
जनतेच्या कामांची अडवणूक करताना त्यांच्याकडून किरकोळ कामासाठी पाच आकडी रकमेपर्यंत पैशांची मागणी होत असेल आणि ही रक्कम राजरोसपणे घेतली जात असेल तर त्याची टक्केवारी नक्कीच वरिष्ठांपर्यंत जात असणार असल्याची चर्चा जाहीरपणे होऊ लागली आहे. संबंधितांच्या तक्रारी आता थेट लाचलुचपत विभागाकडे पुन्हा सुरु झाल्या आहेत. पापाचा घडा भरला असल्यास त्यांचे परिणामही दिसतील. मात्र, त्याआधी ‘प्रोटोकॉल’ अन् ‘व्यवस्था’ या शब्दांखाली ‘या’ मांजरीकडून डोळे सताड उघडे ठेवून केले जाणारे ‘उद्योग’ महसूलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भोगावे लागले नाही म्हणजे झाले. महसूल विभागावर मोठी नामुष्की ओढण्याआधी आणि या विभागाची मोठी बदनामी होण्याआधी आता ‘या’ प्रकरणात खा. सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी शहरातून होऊ लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले पहा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन मुंबई | नगर सह्याद्री देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आ. शिवाजीराव कर्डिले यांची लिलावती रुग्णालयात भेट

अहिल्यानगर । नगर सह्याद्री भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार तथा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव...

मध्यमवर्गीय मालामाल; बळीराजाला दिलासा;अर्थसंकल्पात कोणाला फायदा, कोणाला तोटा, पहा… 

१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला अर्थसंकल्प नवी...

मनपा पाणी पुरवठ्याबाबत खोट्या माहिती पसरवणे चांगलेच भोवले, पुढे घडले असे…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री -  महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी एकाविरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल...