spot_img
महाराष्ट्रअमीर खानच्या दंगल सिनेमातील अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन, धक्कादायक कारण समोर

अमीर खानच्या दंगल सिनेमातील अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन, धक्कादायक कारण समोर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आमिर खानच्या ‘दंगल’ या सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे 19 व्या वर्षी निधन झाले. या निधनाच्या बातमीने सर्वानाच धक्का बसला आहे.
‘दंगल’ चित्रपटात तिने आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच होती. आता अचानक सुहानीच्या निधनाचं वृत्त समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. फरीदाबादमध्ये राहणाऱ्या सुहानीच्या निधनाचं कारण तिच्या संपूर्ण शरीरात पाणी भरल्याचं म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. अपघातानंतर उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली, त्याचा साइड इफेक्ट होऊन हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरलं, असं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

सुहानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार होती. तिने 2016 मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केल होत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...