spot_img
महाराष्ट्रगुंडा राज… 'त्या' फोटोत मुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील गुंड, नेमके काय आहे ते ट्विट?...

गुंडा राज… ‘त्या’ फोटोत मुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील गुंड, नेमके काय आहे ते ट्विट? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात राजकीय नेते व त्यांचे गुंडांशी असणारे संबंध यावर चर्चा होऊ लागली आहे. नुकतेच पार्थ पवार व मारणे भेट यावरून टीका पाहायला मिळाल्या. तर आता नुकतेच आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणास दोन दिवस झाले असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो सोमवारी व्हायरल झाला आहे. त्यात पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली.

सोमवारी या दोन फोटोंवरील चर्चा सुरु असताना मंगळवारी संजय राऊत यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़.

कोण आहेत निलेश घायवळ
निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत आहे. त्याच्यावर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे़त. पुण्यातील गुंड गजानन मारणे आणि घायवळ टोळी या दोन्ही टोळ्यांमध्ये २०१० मध्ये वाद झाला होता. त्यावेळी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता़. या खटल्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती़. आता संजय राऊत यांच्या नव्या आरोपानंतर शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....