spot_img
अहमदनगरAhmednagar News : अहमदनगर शहरात भीषण आग ! हॉस्पिटलसह मोठी दुकाने आगीच्या...

Ahmednagar News : अहमदनगर शहरात भीषण आग ! हॉस्पिटलसह मोठी दुकाने आगीच्या वेढ्यात…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : 
सावेडी रस्त्यावरील साई मिडास टच या व्यावसायिक संकुलातील एचडीबी फायनान्स कार्यालयाला मंगळवारी सकाळी आग लागली. यात कार्यालयाचे फर्निचर आणि महत्त्वाचे कागदपत्र जळू खाक झाले. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी आगीच्या घटनांना महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच हे व्यावसायिक संकुल आहे. या इमारतीत बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना, फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर एचडीबी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारी डोळ्याचा दवाखाना आहे. कार्यालयाच्या बाहेरील बाजुने सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच ही आग भडकली आणि मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिकांनी मनपाच्या अग्निशमन विभागाला कळवली.

अग्निशमन विभागाचा बंब तात्काळ दाखल झाला. पाण्याच्या फवार्‍याने ही आग आटोक्यात आणली. या कार्यालयाजवळच इतर कार्यालय असल्याने सर्वांचाच जीव खालीवर झाला होता. आगीची झळ जास्त पसरण्यापूर्वीच आग आटोक्यात आणली गेली. यासाठी मनपा अग्निशमन दलाच्या तीन आणि एमआयडीसीचा एक बंब वापरला. इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला. भर रोडवर असलेल्या या इमारतीत लागलेली आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तेथील वाहतुकीवरही काही वेळ परिणाम झाला. आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. शॉर्टसर्किटमुळे किंवा अन्य कारणाने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच आ. संग्राम जगताप घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अशा घटनांना मनपा जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, शहरातील इमारतींचे दरवर्षी फायर ऑडीट झाले पाहिजे. परंतु, महापालिका अधिकार्‍यांच्या चुकीमुळे इमारतीचे फायर ऑडीट होत नाही. त्यामुळे आगीच्या घटना शहरात वारंवार घडत आहेत. शहरातील वाढत्या घटनांना महापालिकेचा अधिकारी वर्ग जबाबदार आहे शहरातील अग्निशमन यंत्रणा कमी पडत आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या आर्थिक तडजोडीमुळे इमारतींचे फायर ऑडीट होत नाही. तसेच शहर व उपनगरात पत्र्यांच्या गाळ्यांचा विषय ऐरणीवर आहे. पत्र्याच्या गाळ्याला आग लागल्यास मोठे नुकसान होते. यावर अधिकार्‍यांचा अंकुश राहिलेला नाही. येणार्‍या अधिवेशनात निष्क्रिय अधिकार्‍यांवर

कारवाईसाठी तसेच निष्क्रिय अधिकार्‍यांना अहमदनगरला पाठवू नये, एकाच ठिकाणी जास्त काळ राहिलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी करणार असल्याचे आ. जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...