spot_img
ब्रेकिंगदूध उत्पादकांना खुशखबर; दरात दोन रुपयांनी वाढ; कधीपासून पहा..

दूध उत्पादकांना खुशखबर; दरात दोन रुपयांनी वाढ; कधीपासून पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. नवी दरवाढ उद्यापासून, शनिवारपासून लागू होणार आहे.

पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.

उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे, दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली. प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ.

सध्याचे दर, वाढीव दर
गायीचे दूध – ५४-५६ : ५६-५८
म्हशीचे दूध – ७०-७२ : ७२-७४

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...